किनवट प्रतिनिधी -
आपण महापुरुषाचे विचार अंगिकारून त्यांच्या आदर्श विचारावर चालत असतो त्यांचे विचार आपल्याला सदैव प्रेरीत करत असतात परंतू काही धन दांडग्यांनी याच्या उलट काम करण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणून या विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष लक्ष्मीपती दोनपेल्लीवार , दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष भगवान मारपवार यांनी समाज जागृतीचे काम केले आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या अलीकडील असेलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परीसरात देशी दारूचे दुकान थाटत असलेल्या विकृत विचारा विरोधात किनवट नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक भिसे मॅडम यांना या बद्दल निवेदन दिले यावेळी नप कर्मचारी शे. अतीक, तोफीक खान, रमेश नेम्मानीवार यावेळी उपस्थित होते.
तात्काळ या वर कार्यवाही करून या परिसरात देशी दारु दुकानास परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे या बाबीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे
Comments
Post a Comment