Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुक २०२० साठी किनवट तालुक्यातील निवडणुक यंत्रणा सज्ज

किनवट / तालुका प्रतिनिधी : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्र असून या मतदान केंद्रासाठी 12 मतदान केंद्राध्यक्ष, 36 मतदान अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचारी व 4 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. .मतदान पथक व क्षेत्रिय अधिकारी यांच्या प्रत्येक वाहनावर ( 14 ) जीपीएस सिस्टिम लावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ शूटिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, यांनी दिली.              तहसील कार्यालय, किनवट येथे सोमवार ( दि. 30 नोव्हेंबर) रोजी सकाळी 8 वाजता सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी बोलतांना सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, म्हणाले की, ही निवडणूक अत्यंत पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे, बिनचूक पार पाडावी, कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता प्रत्येक बाब काटेकोरपणे सांभाळावी.            यावेळी तहसीलदार उत्तम कागणे, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, मो

स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जोती आणि सावीत्री यांच्या कार्याचा गौरव करणारी राजेश पाटील यांची रचना

🔵 *शिक्षणाशी मैत्री 🔵*  जोडीण निघाले जोती अन सावीत्री  जोडीण निघाले जोती अन सावीत्री   झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री  झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री अंधार झाला दुर हो अंधार झाला दुर हो संपली ही दलींद्री  संपली हो दलींद्री  झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री वाट होती खडतर  स्वप्न होते सुंदर (शिक्षणाचे)-२ कुठून आडवी आली कुत्री कुठून आडवी आली कुत्री  (त्रास देणारे ) झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री खुल्या केल्या विहिरी  पाणी आले पदरी -२ अशी तहान भागवीली  (म. फूलेनी घरच्या विहिरी खुल्या केल्या ) झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री महार मांग ढोर आणि हो चांभार  शिकून झाले मोठे मंत्री-२ झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री गुरू झाले तिसरे  जिवन झाले हसरे(फूले) आत्ता पटली मला खात्री  झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री जोडीन निघाले जोती अन सावीत्री जोडीन निघाले जोती अन सावीत्री झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री कवी -राजेश बळीराम पाटील सिध्दार्थ न

किनवट शहर भारतीय जनता पार्टीची नवीन कार्यकारीणी जाहीर

(ता . प्र. किनवट)   खासदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व भाजयुमोचे  जिल्हाध्यक्ष अॅड किशोर देशमुख यांच्या अनुमतीने भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी किनवट  शहराची कार्यकारीणी जाहीर केली. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शहर कार्यकारणीस नियुक्तीपत्र देण्यात आले. शहर सरचिटणीसपदी विश्वास कोल्हारीकर, उपाध्यक्षपदी  आकाश भंडारे, राहूल दारगुलवार, राजेंद्र भातनासे, सचिव-जयकुमार वर्मा, कोषाध्यक्ष- नितिन चाडावार, सोशल मिडीया प्रमुख-गौरव इटकेपेल्लीवार, भाजयुमो शहराध्यक्ष कृष्णा बासटवार, सरचिटणी वैभव सिरमनवार, उपाध्यक्ष दिनेश नगरुलवार, शुभम हसबे, दिव्यांग सेल प्रमुख- लक्ष्मण बोलेनवार, व्यापारी आघाडी अध्यक्ष आशिष कंचर्लावार अशी कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यावेळी आ.भीमराव केराम यांनी नवनियुक्त पदाधिकायांना नियुक्तीपत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, न.प.उपाध्यक्ष अजय चाडावार, अनिल तिरमनवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष उमाकांत कहाळे, पं.स.सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, बां

आदिवासींच्या हक्कासाठी महामुक्काम आदोंलन

  किनवट ,ति.२५ : अखिल भारतीय किसान सभा ,आदिवासी आधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष समिती किनवट – माहूर च्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी आजपासून(ता. २५) उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरु झाले आहे    या आंदोलनात प्रचंड संख्येने आदिवासी सामील झाले आहेत. आदिवासींचे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्याच्या  चळवळीपासून आदिवासींना जल, जंगल व जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सशस्त्र उठाव केला. स्वातंत्र्यानंतर माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमीनदार ग्रामीण भागातील सेठ सावकार यांनी जबरदस्तीने किंवा कवडीमोल किमतीने भ्रष्ट तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, दलाल चमचे, यांच्या मदतीने आदिवासींच्या जमिनी हडप करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36 अनुसार आदिवासी खातेदारांच्या जमिनीचे कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणास कडक निर्बंध घालण्यात आलेले असतानासुद्धा किनवट माहूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे करण्याचे सत्र चालूच आहे.     सारखणी(ता. किनवट) येथील सेवानिवृत्त तहसीलदार सितार

डॉ .बाबासाहेब आबेंडकर महापरिनिर्वाण दिन व २६/११ हल्यात शहिद झालेल्या सैनिकास अभिवादनासाठी युवा पँथर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

वर्ष ३ रे  *रक्तदान शिबीर* आयोजक *युवा पॅंथर* किनवट  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या *64 वा महापरिनिर्वाण दिन* *व २६/११ आंतकी हल्यात शहीद दिलेल्या पोलिस विर जवानांना* रक्तदान करुन अभिवादन *आयोजक : अॅड सम्राट सर्पे, निखिल कावळे युवा पॅंथर शाखा किनवट* *दि. ६ डिसेंबर २०२० रविवार* *वेळ : सकाळी 10 वाजता* *स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा किनवट जि नांदेड* संपर्क नं : 8668700748, 8600063325 सौजन्य : गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँक नांदेड. ( टिप : कोरोना महामारी मुळे रक्तदान  शिबीर शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुनच करण्यात येईल  )

किनवट बस्टँड रोडवर ३ टु व्हिलरचा समोरा समोर विचीत्र अपघात एकाचा जागीच मृत्यु तर दोन गंभीर जख्मी

किनवट,ता.२४ : तीन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या विचित्र अपघातात एक ठार,एक गंभीर,तर एक जखमी झाला.हा अपघात आज(ता.२४)सकाळी ११वाजेच्या सुमारास किनवट-माहूर महामार्गावर शांतीभूमी बौध्द स्मशानभूमी जवळ झाला. याबाबतची अधिक माहिती अशी; शहरातील  रंगवैभव कलेक्शन या कापड दुकानात काम करणारा लोणी(ता. किनवट) येथिल निखिल ब्रम्हाजी गुंजकर (वय २४) हा एम. एच. २६ - बी.के. २४४८ क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातून डबलसीट किनवटकडे येत होता, तर टी. एस. ०१ - एफ. ए. २२०९ क्रमांकाची दुचाकी किनवटहून बाहेर जात होती. तीसरी दुचाकी साठेनगरातून किनवट - माहूर महामार्गावर येत होती. या तीनही गाड्यांची विचित्र टक्कर झाली. या अपघातात निखिल गुंजकर हा तरुण जागीच ठार झाला. तर रुद्राक्ष शंकर जल्लावार (वय२२ )रा.साठेनगर ,किनवट याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मोठी जखम झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. समोरुन येणा-या  तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील इच्चोडा मंडळातील आडेगांव येथील चिटफंडचा कर्मचारी बलविरसिंग ठाकूर (वय ४०) हा किरकोळ जखमी झाला आहे. या घाईगर्दीत तीस-या दुचाकीस्वाराने पोबारा केल्याचे बघ्यांनी सांगितले आहे.           जखमींवर य

आदिवासी जागला आज बिरसा कळाया लागला, क्रांतीची मशाल घेऊन पुढे चालाया लागला...बिरसा जयंती निमित्त रंगली काव्य मैफल : क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम

✍️राजेश पाटील किनवट ( प्रतिनिधी ) : क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी डोंगरी तालुक्यातील अंबाडी घाटातील वनक्षत्र कुंडी पठार येथे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित काव्यमैफलित क्रांतिकारक रचना सादर करून बीरसांचा विचारांची पेरणी केली. कवीसंमेलन अध्यक्ष म्हणून 'मी उजेड शोधतोय' या कवितासंग्रहाचे कवी सुभाष बोड्डेवार होते. पत्रकार गोकुळ भवरे, सांगावाकार महेंद्र नरवाडे, रमेश मुनेश्वर, प्रदीप कुडमेथे, रुपेश मुनेश्वर, रामस्वरूप मडावी, व छायाचित्रकार निवेदक कानिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार युवाकवी पंकज भवरे यांनी मानले. "छातीत वादळ फिरून जात कधी कधी  माझ्या गल्लीतलं  उघडे-नागड आदिवासी पोरगं उजेड गच्च भरून घेऊ पाहणारे त्यांचे आदिम अंधाराची डोळे शोधत असतात युगप्रवर्तक पहाट  कधी घरात कधी उरात  तर कधी पोटात  पेटत असलेल्या उपवासी वणव्यात  तेव्हा दर क्षणी  जळत असतो माझ्या मनात शब्दसूर्य.. " ..कवी संमेलनाध्यक्षांनी सामाजिक परिस्थिती विशद करणारी क्रांतिकारक रचना सादर करून कार्यक्रमाच

रमेश मुनेश्वर यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला व क्रीडा मंडळाच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी निवड..

नांदेड ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी रमेश यादवराव मुनेश्वर यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी असून या मंडळाद्वारे आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.  रमेश मुनेश्वर यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रमेश मुनेश्वर हे जिल्हा परिषद नांदेड येथे प्राथमिक शिक्षक असून उत्तम कवी, लेखक, समिक्षक, नाटय कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. सोबतच उपक्रमशील शिक्षक व शालेयवृत्त या वेब न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. मासिक दिवाळी अंक ,साप्ताहिक दैनिकात त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झालेले आहे. नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून ते चांगले काम केले. त्यांच्या या निवडीबदल संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे, राज्य कार्यकारणीचे विजय जोगमार्ग, सचिन कुसनाळे, अलंकार वारघडे, नांदेड कार्यकारणीचे मिलिंद जाधव, विरभद्र मिरेवाड, रणजीत वर्मा, नासा

शशिकांत हिंगोणेकर यांची कविते बद्दल कल्पना कवितेसोबत जगतांना काय वाटत त्या संदर्भी कविता "तुर्त इतकेच कविते"

 (तुर्त इतकेच कविते) माझ्यातला कवी मरू देत नाहीय कविता दुःखातही धगधगत ठेवते आहे  कविता मला आणि हळुवार फुंकरही घालते आहे कविता माझ्या जखमांवर कविते,  कुठल्या जन्माचे  ऋणानुबंध आहेत तुझे नि माझे कालही तू सोबत होतीस आजही आहेस आणि उद्याही तू असशील माझ्या जगण्याची  संजीवनी झाली आहेस तू कुठलाही श्वास जन्माला आला की, तो थांबतो कधी ना कधी तसा मीही थांबणार आहेच केव्हातरी तुझ्यासोबत मात्र माझेही श्वास थांबणार नाहीत असेच वाटतेय मला आजकाल माझ्यातला कवी तुझ्यासोबत ठेवून जाईल मी सर्वकाल तुर्त इतकेच कविते ! ✍ कवी:शशिकांत हिंगोणेकर

आद्य क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा जयंती निमित राजगड येथे कबड्डीचे खुले सामने

(बातमीदार ता .१५ राजगड गाव) राजगड गाव येथे आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा जयंतीच्या पार्शवभूमीवर कबड्डी चे खुले सामने ठेवण्यात आले होतें त्या प्रसंगी लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेब किनवट माहूर मतदार यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले त्यावेळी सरपंच प्रकाश डुकरे, अनिल तिरमनवार, संतोष मरस्कोल्हे आमदार साहेब जनसंपर्क अधिकारी,राम राठोड ग्राम पंचायत सदस्य, वसंत पवार, प्रल्हाद शेळके, नागोराव पारधी पोलीस पाटील, नामदेव आरके, दिलीप उघडे सर, ज्ञानेश्वर शेळके सर, भास्कर पारधी सर, श्रीराम बैरमकर सर आदी ग्रामस्थ उपस्थित होतें.

किनवट येथे जन नायक भगवान बिरसा मुंडा यांची जयती उत्साहात

  (ता. प्र. किनवट/ राजेश पाटील ) आदीवासींच्या न्याय हक्कासाठी जल , जंगल, जमीनीसाठी ज्यांनी ब्रिटीशा विरोधात लढा दिला व उलगुलान नावाची क्रांती घडवुन गेला त्या महापुरुष जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १४५ वी जयंती किनवट येथील अशोक स्तंभाजवळील बिरसा मुंडा पुतळ्या जवळ हर्षोल्हासात साजरी करण्यात आली या वेळी संतोष   मऱ्हस्कोल्हे, दत्ता भीसे,संतोष पहुरकर, शिवाजी सिडाम , आशिष उर्वते, धनराज पेंदोर,सुरज उर्वते, संतोष गुहाडे, गजानन बावणे, किनवट न्यूजचे गंगाधर कदम, राजेश पाटील, अजय सिडाम, स्वप्नील मेश्राम, आशिष कुमरे, सुनिल जुगनाके, किरण  कुमरे, गौरव आत्राम, दिपक कुमरे, दर्शन पिंपळे, वैभव रेडे, विक्की वाघमारे, संजय मेश्राम रोहीत भीसे, अमोल जाधव, सुरज उर्वते व तसेच  बिरसा ब्रिगेड संघठना, नॅशनल गोंडवाना युथ फोर्सचे युवक  व सामाजीक कार्यकर्ते  आदींची उपस्थीती होती या नंतर गोकुंदा येथे बिरसा चौकात व ग्रामीण भागात दंडार नृत्याचे आयोजन करण्यात आले व रॅली काढण्यात आली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत रिपब्लिकन सेनेकडून - सचिन निकम.

  ॲड.अतुल राजेंद्र कांबळे हे विधानपरिषद निवडणुकीची वयोमर्यादा पूर्ण करू न शकल्याने त्यांचा अर्ज रद्द... मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आंबेडकरी मतदार हा महत्वपूर्ण भूमिकेत असल्याने आंबेडकरी मतदारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच रिपब्लिकन सेनेने ह्या निवडणुकीत उडी घेतल्याने ह्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेचा कौल कुणाकडे राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीने सर्वात अगोदर उमेदवार जाहीर केल्याने ह्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना चर्चेत आली आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.अतुल राजेंद्र कांबळे यांची उमेदवारी पक्षाने घोषित केल्याने विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा घडून आली होती. परंतु ॲड.अतुल कांबळे हे विधानपरिषद उमेदवारी साठीची वयोमर्यादा पूर्ण करू शकत नसल्याने तात्काळ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व मराठवाडा विभागातील विद्यार्थी चळवळीतील आंबेडकरी

किनवट पोलिस प्रशासना तर्फे दिवाळी निमित्त फराळाचे वाटप

  (तालुका प्रतिनिधी किनवट): दिवाळी सणाचे औचित्य साधुन किनवट पोलिस स्टेशन प्रशासना तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले तसेच कायद्या बद्दल मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी विचार मंचावर पोलीस उपविभागिय अधिकारी मंदारजी नाईक, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, सह पोलिस निरीक्षक भोळ, बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पंजाब शेरे, गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्थेच्या प्रमुख सौ. संगिता पाटील, प्रा. वसंत राठोड,NGO सहयोगीनी रुचीता फुलझेले हे उपस्थीत होते यावेळी मंदार नाईक यांनी कायद्या बद्दल मार्ग दर्शन केले त्यांनी सांगितले कि कुठल्याही समस्या असो अडचणी महीलां भगीनींनी मनात कुठलीही भीती न बाळगता निसंकोच बिन दिक्कत आम्हाला सांगावे पोलीस स्टेशनचे दरवाजे नेहमी तुमच्या मदती साठी खुली आहेत , या नंतर संगिता पाटील यांनी मन मोकळा संवाद महिलांशी साधला , यानंतर प्रा. पंजाब शेरे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले व आपला अनुभव सांगीतला महिलासांठी उपयोगी कलमे सांगीतली या नंतर उपस्थीत महिलांनी प्रश्न मांडले व मनोगत मांडले तसेच पोलीस विभागा तर्फे गरजु महिलांना मोफत आरोग्य चाचण्या करण्यात आल्या व तद नंतर फराळाचे व

विठाबाई लक्ष्मण कावळे यांचे निधन : रविवार (ता. 08) रोजी दुपारी 4 वाजता अंत्यविधी

  किनवट प्रतिनिधी : सिद्धार्थनगर येथिल ज्येष्ठ नागरिक विठाबाई लक्ष्मण कावळे (वय 95 वर्षे ) यांचे रविवार (ता. 8 नोव्हेंबर 2020 ) रोजी सकाळी 10:00 वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. जेतवन बुद्ध विहार सिध्दार्थनगर जवळील त्यांच्या घरापासून रविवार (ता. 8 नोव्हेंबर 2020 ) रोजी दुपारी 04:00 वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून शांतीभूमी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडं असा मोठा परिवार असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव कावळे यांच्या त्या मातोश्री व पत्रकार सुरेश कावळे यांच्या त्या आजी होत.

आमदार भिमराव केराम यांची अनुसुचित जमाती कल्याण समिती सदस्यपदी निवड

  किनवट ता .प्र . :   अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी किनवट माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांची निवड करण्यात आली असून विधानसभा नियम २३५ अन्वये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आ. केराम यांची निवड केल्याने तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.    दि.३ नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभा नियम २३५ नुसार अनुसुचित जमाती कल्याण समितीची निवड करण्यात आली.  या निवडीत अनुसुचित जमाती कल्याण समिती प्रमुख (अध्यक्ष)  म्हणून श्री. दौलत दरोडा, विधानसभा सदस्य यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून कार्यरत असलेले श्रीनिवास वनगा यांच्यासह महेंद्र दळवी, अनिल पाटील, शिरीष चौधरी, साहसराम कोरोटे, डॉ.अशोक उईके, डॉ. तुषार राठोड, राजेश पाडवी, भिमराव केराम व राजकुमार पटेल यांची अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी विधानसभा अध्यक्ष्यांच्या हस्ते निवड करण्यात आली. या निवडीने आदिवासींच्या कल्याणासाठी आ. केराम यांना हत्तीचे बळ मिळेल ही भावना व्यक्त करून सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काव्यमैफल रंगली !

 "जागले एक स्वप्न नवे मंद का श्वास आहे, गुंतले तुझ्यात मी प्रेमाचा आभास आहे.." नांदेड ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड यांच्यावतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेली ऑनलाईन काव्यमैफल बहारदार रंगली. काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड होते तर नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर हे उद्घाटक होते. कविसंमेलनात कवी मिलिंद जाधव, राणी नेमानीवार, साहेबराव कांबळे . रुपेश मुनेश्वर, अर्चना गरुड, विजया तारु, महेंद्र नरवाडे, गणपत गायकवाड, मनोहर बसवंते, सूर्यभान खंदारे, सागर गौरव, सोनबा दवणे सहभागी होते. रमेश मुनेश्वर यांनी 'शब्द:चक्षु' ही कविता सादर करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर 'मातीत शाबूत राहावी म्हणून ' ही कविता कवी संमेलनाध्यक्ष वीरभद्र मिरेवाड यांनी सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी नेमानीवार यांनी केले, प्रास्ताविक सरचिटणीस मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार रुपेश मुनेश्वर यांनी केले. साहेबराव कांबळे या कवीने सुंदरसे रचना सादर करून वाहवा मिळव