शशिकांत हिंगोणेकर यांची कविते बद्दल कल्पना कवितेसोबत जगतांना काय वाटत त्या संदर्भी कविता "तुर्त इतकेच कविते"
(तुर्त इतकेच कविते)
माझ्यातला कवी
मरू देत नाहीय कविता
दुःखातही
धगधगत ठेवते आहे
कविता मला
आणि हळुवार फुंकरही
घालते आहे कविता
माझ्या जखमांवर
कविते,
कुठल्या जन्माचे
ऋणानुबंध आहेत
तुझे नि माझे
कालही तू सोबत होतीस
आजही आहेस
आणि उद्याही तू असशील
माझ्या जगण्याची
संजीवनी झाली आहेस तू
कुठलाही श्वास
जन्माला आला की,
तो थांबतो कधी ना कधी
तसा मीही थांबणार आहेच
केव्हातरी
तुझ्यासोबत मात्र
माझेही श्वास
थांबणार नाहीत
असेच वाटतेय मला
आजकाल
माझ्यातला कवी
तुझ्यासोबत ठेवून जाईल
मी सर्वकाल
तुर्त इतकेच कविते !
✍ कवी:शशिकांत हिंगोणेकर
Comments
Post a Comment