Skip to main content

आदिवासींच्या हक्कासाठी महामुक्काम आदोंलन

 


किनवट ,ति.२५ : अखिल भारतीय किसान सभा ,आदिवासी आधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष समिती किनवट – माहूर च्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी आजपासून(ता. २५) उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरु झाले आहे

   या आंदोलनात प्रचंड संख्येने आदिवासी सामील झाले आहेत.



आदिवासींचे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्याच्या  चळवळीपासून आदिवासींना जल, जंगल व जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सशस्त्र उठाव केला. स्वातंत्र्यानंतर माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमीनदार ग्रामीण भागातील सेठ सावकार यांनी जबरदस्तीने किंवा कवडीमोल किमतीने भ्रष्ट तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, दलाल चमचे, यांच्या मदतीने आदिवासींच्या जमिनी हडप करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36 अनुसार आदिवासी खातेदारांच्या जमिनीचे कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणास कडक निर्बंध घालण्यात आलेले असतानासुद्धा किनवट माहूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे करण्याचे सत्र चालूच आहे.


    सारखणी(ता. किनवट) येथील सेवानिवृत्त तहसीलदार सिताराम रामजी कूडमेत्ते,डोणीकर यांचे वडील रामजी महादू कुडमेते डोनीकर यांना हैदराबाद कूळ कायदा ३८ ई प्रमाणे २१ मे १९५७ ला ३० एकर जमीन मिळाली होती.परंतु,सारखणी परिसरातील भूमाफियानी बळजबरी ने महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात जमिनीची लूट करून आलिशान बंगले उभे केले आहेत. उदरनिर्वाहासाठी शिल्लक असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून किनवट -  माहूर राज्य मार्गाला लागून असलेल्या जमिनीच्या काही क्षेत्रावर 11 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी दहा वाजता च्या सुमारास गैर आदिवासी रमेश राठोड, निर्मला राठोड, मयूर रमेश राठोड, यांनी बेकायदेशीर 15 ते 20 लोकांचा जमाव करून कुडमेते, डोणीकर व परिवाराला जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देऊन अतिक्रमण करून टिनाचे शेड उभे केले आहे. सदर अतिक्रमणाबाबत तहसीलदार किनवट,पोलीस स्टेशन सिंदखेड यांना तक्रार दिली असता अद्याप कारवाई झालेली नाही. दिवसेंदिवस आदिवासी वरील अत्याचार वाढतच आहे.अन्याय अत्याचाराच्या विरोधात सारखणी सह किनवट - माहूर तालुक्यातील आदिवासींच्या हस्तांतरित जमिनीची एसआयटीमार्फत चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्याला किंवा त्यांच्या वारसांना जमीन परत देण्याची कारवाई करा,11 फेब्रुवारी 2020 रोजी कुडमेते, डोनीकर कुटुंबीयांच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण तत्काळ हटवा व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे अतिक्रमण धारकावर गुन्हे दाखल करा, कसत असलेल्या जमिनीचे पट्टे वाटप करा, उनकेश्वर येथील माधव गेडाम यांना मारहाण करून पिकाची नासाडी करणाऱ्या मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करा व तत्काळ नुकसानभरपाई देऊन सहकार्य करा,निराळा येथील माजी सरपंच सुनील गेडाम यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब जेरबंद करा, या मागणीसाठी आदिवासी आधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष,किसान  समिती व किसान सभा माहूर -किनवट च्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी  उपविभागीय कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरु झाले  आहे.

  या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीया किसान सभा राज्य अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच चे कॉम्रेड शंकर सिडाम, माकप राज्य समितिचे सदस्य काॅ.अर्जुन आडे आदिवासी संघर्ष समिती किनवट माहूर चे वसंत कुडमेते,गणपत मडावी,काॅ.शेषेराव ढोले,दादाराव टारपे हे करत अाहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.