Skip to main content

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुक २०२० साठी किनवट तालुक्यातील निवडणुक यंत्रणा सज्ज



किनवट / तालुका प्रतिनिधी : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्र असून या मतदान केंद्रासाठी 12 मतदान केंद्राध्यक्ष, 36 मतदान अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचारी व 4 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. .मतदान पथक व क्षेत्रिय अधिकारी यांच्या प्रत्येक वाहनावर ( 14 ) जीपीएस सिस्टिम लावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ शूटिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, यांनी दिली.


             तहसील कार्यालय, किनवट येथे सोमवार ( दि. 30 नोव्हेंबर) रोजी सकाळी 8 वाजता सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी बोलतांना सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, म्हणाले की, ही निवडणूक अत्यंत पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे, बिनचूक पार पाडावी, कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता प्रत्येक बाब काटेकोरपणे सांभाळावी. 


          यावेळी तहसीलदार उत्तम कागणे, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, मोहम्मद रफीक, अनिता कोलगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण दिले. याप्रसंगी स्वामी मल्लिकार्जुन, राम बुसमवार यांनी मतपेटीचे प्रात्यक्षिक दाखविले.


             शेवटचे टोक असलेल्या मांडवी येथील मतदान केंद्राच्या पहिल्या पथकास सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सर्वप्रथम रवाना केले. यावेळी क्षेत्रिय अधिकारी डॉ.एस.एन.आडपोड, प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर व अनिलकुमार महामुने उपस्थित होते.


पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटील,पी.पी. सूर्यवंशी, एस.बी.सरनाईक, गोविंद पांपटवार, एम. एम. कांबळे, टोम्पे, नितीन शिंदे आदि तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत.







Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...