Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

पद्मशाली समाज संघटनेची नुतन कार्यकारणी गठीत

  किनवट ता. प्रतिनिधी- पद्मशाली समाज संघटनेची नुतन कार्यकरणी नुकतीच गठीत करण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हास्तरीय पद्मशाली समाज संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया घेऊन मार्कंडेय सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून नांदेड येथील अशोक श्रीमनवार, शिवाजी अनंमवार, दत्ता कोंपलवार, अमृतवार यांनी प्रोढ अध्यक्ष निवड प्रकाश दासरवार व तालुका युवक अध्यक्ष नागभुषन येंबरवार तसेच महिला अध्यक्ष सौ. पुष्पाताई मच्छेवार यांची  बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी मा.नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्रा. विजय उपलेंचवार, सुनील मच्छेवार, पत्रकार सुनील श्रीमनवार, शिवा क्यातमवार, संतोष ताडेवार  ,भुमन्ना कोंकलवार, मारोती मुलकेवार,मार्कंडेय सिरामवार, विवेकानंद पेरकलवार, तसेच समाज बांधव गजानन बंडेवार प्रविण श्रीमनवार  प्रशांत बिंगेवार, सचिन बासेवार,संदेश कटकंमवार, संतोष कोंकलवार, राजेश म्यांकलवार, विट्टल म्यांकलवार, नरसिंग क्यातमवार, उमाकांत म्यांकलवार, इस्तारी पत्तेवार, सुरेश अलचेटिवार, किष्टु गंगुलवार, आशिष ताडेवार, किरण कस्तुरवार, प्रभाकर दासरवार, संजय मामीडवार, श्रीनिवा...

"गोंडर' कादंबरीला शब्दवेल "स्व.नर्मदाबाई तु.धर्माळे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार" जाहीर..

○ 21/22 डिसेंबर रोजी सातारा येथे वितरण ○ मा.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते  नांदेड- आज सर्जनशील शब्दवेल,पनवेल. या नामांकित संस्थेचा अतिशय सन्मानाचा स्व. नर्मदाबाई तू धर्माळे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार-2024 सन्मानाचा पहिला पुरस्कार 'गोंडर' या बहुचर्चित कादंबरीला जाहीर झाला आहे. दिनांक 21 आणि 22 रोजी सातारा येथे होणाऱ्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. 'गोंडर' कादंबरीला मिळालेला हा 24 वा राज्यस्तरीय पुरस्कारासून गोंडर ही कादंबरी महाराष्ट्र/ कर्नाटक/ गुजरात/ मध्य प्रदेश अशा विविध राज्यासोबत जपान /कॅनडा/ मलेशिया/ सिंगापूर/ युके अशा विविध देशांमध्ये सुद्धा वाचकांची आवडीची ठरली आहे.'गोंडर' कादंबरीला परवाच गडचिरोली येथील 'महामृत्युंजय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार' जाहीर झाला आहे. 15 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे वितरण होणार आहे.  अनेक मान्यवर पुरस्काराने सन्मानित झालेल्या गोंडर कादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद आणि कादंबरीची विक्रमी विक्री ...

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करा- सकल मराठा समाज

  किनवट प्रतिनिधी : मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यास तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी व पोलीस स्टेशन कार्यालय किनवट येथे निवेदन देण्यात आले  1 डिसेंबर 2024 रोजी मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूर व निर्दयी पणे हत्या करणाऱ्या सर्व आरोपीस तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आली.  या निवेदनावर सुरेश सोळंके पाटील.सचिन कदम. आकाश इंगोले.अजय कदम पाटील.संतोष डोंनगे. विक्रम पवार.वैभव हजबे. बबन वानखेडे. बाळासाहेब यादव. दत्ता नरवाडे. बालाजी आंकडे. नंदकिशोर जामगे. उमाकांत कराळे. सुमित माने. शिवा पवार. संदीप कदम. कृष्णा वरुडे .आदींच्या स्वाक्षरी आहेत.

मुख्यमंत्री साहेब आमाच्याकडेही लक्ष असु द्या! होमगार्ड वर्धापण दिनी व्यक्त झाल्या भावना

  (किनवट बातमीदार) ता.२२ किनवट येथील होमगार्ड तालुका समादेशक कार्यालया तर्फे ७८ व्या वर्धापण दिना निमित्त रस्त्याच्या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला व शासकीय क्रिडा संकुल येथे परेड घेण्यात आला. या वेळी तालुका समादेशक अधिकारी संजय कोंडापलकुलवार, अंशकालीन लिपिक प्रल्हाद एडके, सार्जंट मेजर सय्यद फेरोज अली, सेक्शन लिडर ज्ञानेश्वर सुर्यवंशी, दिपक भास्कर पत्की, माया येरेकार, सुनिता मंत्रीवार, यमुना कुमरे, ज्योती कांबळे तथा सर्व होमगार्ड पथक कर्मचारी उपस्थित होते. ▪️प्रतिक्रिया- होमगार्डच्या मानधनात वाढ केली गेली तरीही शासनाने आम्हाला 365 दिवस ड्युटी लावून सहकार्य करावे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेआम्हालाही सवयी सुविधा द्याव्या आम्ही घरी जातो तेव्हा आम्हाला लेकरे विचारतात बाबा आमच्यासाठी काय आणलं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येतं शासनाने आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे तसेच सेवा निवृती नंतर पेंशन द्यावे व आमचा प्रश्न मिटवावा- होमगार्ड मुंडे ▪️ आम्ही एवढ्या वर्षा पासुन जिवाची पर्वा न करता घरदार लेकर बाळ सोडून होमगार्ड मध्ये मानधन तत्वावर नोकरी करत आहोत परंतु आम्हाला इतर ...

परभणी घटनेच्या निषेधार्थ किनवट मध्ये कडकडीत बंद

किनवट,ता.१६ : सर्व पक्षीय आंबेडकरवादी व संविधानप्रेमी कृती समितीच्या वतीने आज(दि.१६) दिलेल्या किनवट बंदच्या हाकेला १०० टक्के प्रतिसाद  मिळाला.   कृती समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गाने फिरुन मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला.एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन सादर केले.निवेदनात नमुद केले आहे की,परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपीना तात्काळ अटक करून परभणीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात अपशयी ठरलेल्या पोलीस अधिका-यावर निलंबनाची कारवाई करा.    परभरणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही जातीयवादी समाजकंटाकडुन  १० डिसेंबर रोजी तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परभणीतील आंबेडकरी समुदायाने  १२ डिसेंबर रोजी बंदची हाक दिली होती. या बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती आबाधीत राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी परभणी पोलीसांची होती. परंतु, परभणी...

पुस्तक परीक्षण “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ; समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री

 “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ; समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ                                                                       पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री लेखक :- डॉ. हेमंत सोनकांबळे प्रकाशक :- कैलास पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर प्रकाशन तारीख :- 12 ऑक्टोबर, 2024 पृष्ठ संख्या :- 290 किंमत :- ₹ 350                                                 समाजशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्राध्यापक डॉ. हेमंत सोनकांबळे यांचे “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक विशेषत : एन.ई.पी. २०२०, सी.बी.सी.एस./यु.जी.सी. अभ्यासक्रमावर आधारित आहे. हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ...

संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्या - किनवट च्या संविधनप्रेमी जनतेची मागणी

  किनवट  दि १३ :  परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरू सोपान पवारवर  देशद्रोहाचा गुन्हा नोंदवुन  गुन्हा दाखल करून  फाशीची शिक्षा देण्यात यावी.  अशी मागणी  किनवट च्या संविधनप्रेमी जनतेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी   यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेमुळे संविधान प्रेमींच्या च्या भावना दुखावल्या आहेत.संविधान व महापुरुषांचा अवमान होत असून अश्या विकृत घटना घडू नये यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावीत .  या घटनेचा संविधानप्रेमी व आंबेडकरप्रेमींच्या  वतीने निषेध करण्यात आला . परभणी व परिसरातील बौद्ध वस्त्यांवर हल्ला करून पकडण्यात आलेल्या युवकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी . घटनेमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याचा शोध घेऊन कठोर कारवाही करावी .  यावेळी  निखिल कावळे, विशाल हलवले, दया पाटील , सम्राट कावळे  , राहुल सर्पे , सचिन कावळे ,सुरेश मुनेश्र्वर,आकाश सर्पे ,सुमेध कापसे ,गौतम पाटील , सुमेध रावळे,बंटी भवरे , संदीप दोराटे ,...

तालुका विधी सेवा समितीवर ॲड.मिलिंद सर्पे व ॲड.पी.जी.घुले

किनवट,दि.११ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,नांदेड यांच्या एका पत्रान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर,किनवट या न्यायालयात पॅनल विधिज्ञ म्हणून अॅड मिलिंद सर्पे व अॅड.पी.जी.घुले यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे.तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)पी.एम.माने यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्पे व घुले यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. -------------------------------------------------------

भीम क्रांती सूर्य गीत संग्रहाचे थाटात प्रकाशन

  किनवट: प्रबोधन चळवळीतील शिलेदार शाहीर नरेंद्र दोराटे यांनी लिहिलेल्या भीम क्रांती सूर्य गीत संग्रहाचे प्रकाशन विद्यानगर गोकुंदा येथील तक्षशिला बुद्ध विहारात साहित्यिक डॉ.प्रा.पंजाब शेरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी साहित्यिक प्रा.गजानन सोनोने,उप प्राचार्य सुभाष राऊत, पांडुरंग साळवे, पत्रकार दिलीप पाटील,मुख्याध्यापक प्रदीप कांबळे ,मोहनराव गच्चे,यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी साहित्यिक महेंद्र नरवाडे व सागर शेंडे यांनी वंदना घेतली.याप्रसंगी प्रा. डॉ.पंजाब शेरे यांनी शाहीर नरेंद्र दोराटे यांनी लिहिलेल्या या तिसऱ्या पुस्तकांचे विमोचन करताना*भीम क्रांती सूर्य*या गीत संग्रहातील महामानवांची गीते अतिशय प्रेरणादायी असून जिजाऊ,छ.शिवराय,फुले,शाहु, आंबेडकर,रमाई,बिरसा मुंडा, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करणारी आहेत असे प्रतिपादन केले.याप्रसंगी विद्यानगर येथील मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

साने गुरुजी रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

किनवट ता. प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महा परिनिर्वाण दिना निमित्त साने गुरुजी रुग्णालयात अभिवादन करण्यात आले  कार्यक्रमाच्या सुरवातीस राजेश पाटील यांनी बुद्ध वंदना घेतली तर सुत्र संचालन अंजिक्य कयापाक यांनी केले  यावेळी सानेगुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे खडतर जिवन जगले व परीस्थिती बदलून भारताला नवी दिशा दिली , सर्व जाती धर्मातील लोकांना एका माळेत ओवले व भेदभाव मिटवला तसेच भारता विषयक  दृष्टिकोन , सामाजिक कार्य , संविधान उभारणीतील सिहंचा वाटा या विषयी सविस्तर अशी माहिती दिली यावेळी ,अजिंक्य कयापाक ,परमेश्वर कदम , विपीन पवार ,शेकन्ना बंडेवार , डॉ. भाग्यश्री बेलखोडे वरटकर ,नितीन भडंगे ,अर्चना डोंगरे व साने गुरुजी रुग्णालय कर्मचारी स्टॉफ इत्यादी उपस्थित होते.

युवा पँथरचा उपक्रम रक्तदान करून महामानवाला वाहिली आदरांजली

किनवट,दि.६ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतीशिल अभिवादन करण्यासाठी व २६/११ च्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, वीर-जवानांना रक्तदान करून अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी(दि.६) सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.यात दुपारी दोन वाजेपर्यंत ५० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा आकडा ७५ त्यावर पोहचेल अशी माहिती माहिती युवा पॅंथर संघटनेचे अध्यक्ष अॅड.सम्राट सर्पे व सचिव निखिल कावळे यांनी दिली.शिबिराचे हे ७ वे वर्षे आहे.   शिबिराचे आयोजन युवा नेते राहुल सर्पे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी १० च्या सुमारास अनेक मान्यवरांच्या हस्ते डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिकरित्या वंदना घेतली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके,पीरिपा चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, प्राचार्या शुभांगीताई ठमके,माजी नगराध्यक...

उत्तर प्रदेशातील मुस्लीम युवकाची सर्वे करण्याच्या नावाखाली हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करा- टिपु सुलतान ब्रिगेड

  किनवट ता. प्रतिनिधी: उत्तर प्रदेशातील संभल शहरात मस्जीदीच्या सर्वे करण्याच्या नावाखाली मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली व दंगल घडवण्यात आली  या प्रकरणी दोषी संबधित दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी टिपु सुलतान बिगेडतर्फे  महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मार्फत देण्यात आले . सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशातील संभाल शहरात असलेल्या जमा मस्जिद चे सर्वे करण्यासाठी प्रशासन आले होते त्याचवेळी काही दंगल खोरांनी तेथे येऊन मुस्लिम समाजाचे विरोधात घोषणाबाजी करून मस्जीदीवर तुफान दगडफेक केली मुस्लिम समाजाच्या दुकानावर घरावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दंगल खोरावर काही कारवाही न करता उलट मुस्लिम समुदायाच्या विरोधात एकतर्फी कारवाई करून मज्जिद्दीवर निरपराध मुस्लिम समुदाया वर गोळीबार केला या गोळीबारात पाच मुस्लिम युवकांचा जीव गेला तसेच पोलिसांनी २५०० निरप्राप मुस्लिम लोकांवर गुन्हे दाखल केले तरी उत्तर प्रदेशातील 100 शहरात दंगल घडविणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी तसेच निरप्राप मुस्लिम योगावर ...