Skip to main content

पुस्तक परीक्षण “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ; समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री




 “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ;

समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ

                                                                      पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री

लेखक :- डॉ. हेमंत सोनकांबळे

प्रकाशक :- कैलास पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर

प्रकाशन तारीख :- 12 ऑक्टोबर, 2024

पृष्ठ संख्या :- 290

किंमत :- ₹ 350                   

                             समाजशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्राध्यापक डॉ. हेमंत सोनकांबळे यांचे “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक विशेषत : एन.ई.पी. २०२०, सी.बी.सी.एस./यु.जी.सी. अभ्यासक्रमावर आधारित आहे. हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  आणि महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांच्या बी.ए. आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय, SET/NET आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातही हे पुस्तक अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. या पुस्तकात समाजशास्त्राचे विविध दृष्टिकोन, भारतीय सामाजिक विचारवंतांची भूमिका आणि आधुनिक समाजशास्त्राचे परिप्रेक्ष्य मांडले गेले आहेत.

                        महात्मा जोतीराव फुले कला व विज्ञान महाविद्यालय, गोकुंदा (किनवट) येथे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले लेखक, आमचे मित्र, डॉ. हेमंत लक्ष्मणराव सोनकांबळे हे समाजशास्त्र विषयाचे अभ्यासक असून शिक्षण, संशोधन आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत त्यांचे अनमोल योगदान आहे. ते कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेचे राज्य सचिव आहेत, त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजशास्त्र विषयक २९ शोधनिबंध सादर केले आहेत. फुले-शाहू-आंबेडकर चळवळींचे तसेच आदिवासी प्रश्नांचे ते  अभ्यासक  आहेत. आदिवासी गोंड जमतीवर त्यांनी संशोधन केले आहे. याशिवाय 'समाजशास्त्र परिचय आणि सामाजिक संस्था' (२०१४), 'पाचात्य समाजशास्त्रीय विचारवंत' (२०१८) हे समाजशास्त्राचे तर 'जाती अंताची लढाई' (२०२१) कविता संग्रहाचे लेखन त्यांच्या नावे आहे. 

                 समाजशास्त्र हे मानवजातीच्या उत्क्रांतीपासूनच आपल्या सभोवतालच्या समाज व जगाला जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे शास्त्र आहे. याच अनुषंगाने “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक भारतीय समाजशास्त्रीय विचारांना एक सुस्पष्ट चौकट प्रदान करते. या पुस्तकात भारतीय समाजशास्त्रातील सामाजिक  विचारवंतांच्या विचारांची सखोल मांडणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रकरणात महत्त्वपूर्ण सामाजिक विचारवंतांचे जीवनचरित्र, कार्य, विचार आणि योगदान यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. प्रमुख प्रकरणांमध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे शेतकरी, शिक्षण व धर्मसुधारणांसाठीचे योगदान, अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याची मांडणी केली आहे, राजर्षी शाहू महाराज यांचे आरक्षण विषक धोरण, सामाजिक समता, शैक्षणिक धोरण व महिलांसाठी केलेले महत्त्वाचे कार्य याची माहिती दिली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाची वैचारिक भूमिका, जाती व्यवस्थेवर सखोल अभ्यास, कामगार कल्याण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचा आढावा घेतला आहे. या शिवाय महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये, डॉ. एम.एन. श्रीनिवास, डॉ. इरावती दिनकर कर्वे, डॉ.ए.सी.दुबे आदींचे जीवनचरित्र,कार्य आणि योगदान यांची विस्तृतपणे मांडणी केली आहे. पुस्तकातील दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे समाजशास्त्रज्ञांचा सिद्ध्न्ताचे विश्लेषणही अत्यंत तपशीलवार आहे. हे पुस्तक समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी केवळ एक शैक्षणिक साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या व  बदलांच्या गतीला समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. या पुस्तकाची भाषा सोपी, प्रवाही व अभ्यासकांना आकलन होईल अशी आहे. प्रकरणांची सुलभ आणि स्पष्ट भाषेत मांडणी, गुंतागुंतीच्या संकल्पनांना सोप्या शब्दांत समजावून देण्याचा कौशल्यपूर्ण प्रयत्न केला आहे. लेखकाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे. विचारवंतांचे जीवनचरित्र, विचार, तत्त्वज्ञान, सिद्धांत व संकल्पना सहज समजावून देण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत.

                          डॉ. हेमंत सोनकांबळे यांचे “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून आजच्या समाजात सामाजिक विषमता, धर्म, भाषा व जातीवाद आणि भेदभावावर आधारित समाजात अनेक  सामाजिक समस्या दिसून येतात,या समस्यांवर वैचारिक आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून उपाय सुचवण्यासाठी या पुस्तकातील विचारवंतांचे विचार आणि  भूमिका महत्त्वाच्या  ठरतील  असा विश्वास वाटतो. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक चळवळी क्षीण झाल्या आहेत, त्या गतिमान करण्यास या विचारवंतांचे विचार मदत करतील असी आशा वाटते. NEP 2020 च्या अनुषंगाने भारतीय समाजशास्त्राचे मूलभूत विचार, संकल्पना आणि तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे पुस्तक यशस्वीरीत्या करेल, या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हे पुस्तक समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि प्राध्यापिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते प्रत्येकाने खरेदी करून आपल्या संग्रही ठेवावे असे आहे.


                                         पुस्तक परीक्षण,

                                        डॉ. प्रकाश खेत्री,

                                            अध्यक्ष

                           कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, 

                                            महाराष्ट्र


                          ===================

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...