(किनवट बातमीदार) ता.२२
किनवट येथील होमगार्ड तालुका समादेशक कार्यालया तर्फे ७८ व्या वर्धापण दिना निमित्त रस्त्याच्या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला व शासकीय क्रिडा संकुल येथे परेड घेण्यात आला.
या वेळी तालुका समादेशक अधिकारी संजय कोंडापलकुलवार, अंशकालीन लिपिक प्रल्हाद एडके, सार्जंट मेजर सय्यद फेरोज अली, सेक्शन लिडर ज्ञानेश्वर सुर्यवंशी, दिपक भास्कर पत्की, माया येरेकार, सुनिता मंत्रीवार, यमुना कुमरे, ज्योती कांबळे तथा सर्व होमगार्ड पथक कर्मचारी उपस्थित होते.
▪️प्रतिक्रिया-
होमगार्डच्या मानधनात वाढ केली गेली तरीही शासनाने आम्हाला 365 दिवस ड्युटी लावून सहकार्य करावे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेआम्हालाही सवयी सुविधा द्याव्या आम्ही घरी जातो तेव्हा आम्हाला लेकरे विचारतात बाबा आमच्यासाठी काय आणलं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येतं शासनाने आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे तसेच सेवा निवृती नंतर पेंशन द्यावे व आमचा प्रश्न मिटवावा- होमगार्ड मुंडे
▪️ आम्ही एवढ्या वर्षा पासुन जिवाची पर्वा न करता घरदार लेकर बाळ सोडून होमगार्ड मध्ये मानधन तत्वावर नोकरी करत आहोत परंतु आम्हाला इतर शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे मान सन्मान वागणुक मिळावी हि आमची माफक अपेक्षा आहे कोणताही सण असो उत्सव असो सर्वांच्या पुढे जाऊन आम्ही ड्युटी करतो आमची एकच मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्याकडे लक्ष देवुन आमचे प्रश्न त्वरीत सोडवावे आमचा गांभीर्याने विचार करावा - महिला होमगार्ड सुनिता मंत्रीवार
▪️ आज ७८ वर्षा झाले शासनाने आजही होमगार्ड अनेक सुविधा पासुन वंचीत आहे आमचा विचार करावा- माया गौतम येरेकार
Comments
Post a Comment