उत्तर प्रदेशातील मुस्लीम युवकाची सर्वे करण्याच्या नावाखाली हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करा- टिपु सुलतान ब्रिगेड
किनवट ता. प्रतिनिधी:
उत्तर प्रदेशातील संभल शहरात मस्जीदीच्या सर्वे करण्याच्या नावाखाली मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली व दंगल घडवण्यात आली या प्रकरणी दोषी संबधित दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी टिपु सुलतान बिगेडतर्फे महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मार्फत देण्यात आले .
सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशातील संभाल शहरात असलेल्या जमा मस्जिद चे सर्वे करण्यासाठी प्रशासन आले होते त्याचवेळी काही दंगल खोरांनी तेथे येऊन मुस्लिम समाजाचे विरोधात घोषणाबाजी करून मस्जीदीवर तुफान दगडफेक केली मुस्लिम समाजाच्या दुकानावर घरावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दंगल खोरावर काही कारवाही न करता उलट मुस्लिम समुदायाच्या विरोधात एकतर्फी कारवाई करून मज्जिद्दीवर निरपराध मुस्लिम समुदाया वर गोळीबार केला या गोळीबारात पाच मुस्लिम युवकांचा जीव गेला तसेच पोलिसांनी २५०० निरप्राप मुस्लिम लोकांवर गुन्हे दाखल केले तरी उत्तर प्रदेशातील 100 शहरात दंगल घडविणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी तसेच निरप्राप मुस्लिम योगावर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व सेवेतून बडतर्फ करण्यात यावे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड शाखा किनवट च्या वतीने करण्यात आली या निवेदनावर सय्यद नदीम टिपू सुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नांदेड, शेख जुबेर उपाध्यक्ष , खान शेख , नोमान शेख, फैसल शेख ,उमर शेख ,मदस्सीर शेख , शेख जावेद ,अखनीर खान, साहिल शेख, अशपाक शेख ,रेहान , वसीम भाटी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment