○ 21/22 डिसेंबर रोजी सातारा येथे वितरण
○ मा.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते
नांदेड-
आज सर्जनशील शब्दवेल,पनवेल. या नामांकित संस्थेचा अतिशय सन्मानाचा स्व. नर्मदाबाई तू धर्माळे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार-2024 सन्मानाचा पहिला पुरस्कार 'गोंडर' या बहुचर्चित कादंबरीला जाहीर झाला आहे.
दिनांक 21 आणि 22 रोजी सातारा येथे होणाऱ्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. 'गोंडर' कादंबरीला मिळालेला हा 24 वा राज्यस्तरीय पुरस्कारासून गोंडर ही कादंबरी महाराष्ट्र/ कर्नाटक/ गुजरात/ मध्य प्रदेश अशा विविध राज्यासोबत जपान /कॅनडा/ मलेशिया/ सिंगापूर/ युके अशा विविध देशांमध्ये सुद्धा वाचकांची आवडीची ठरली आहे.'गोंडर' कादंबरीला परवाच गडचिरोली येथील 'महामृत्युंजय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार' जाहीर झाला आहे. 15 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे वितरण होणार आहे. अनेक मान्यवर पुरस्काराने सन्मानित झालेल्या गोंडर कादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद आणि कादंबरीची विक्रमी विक्री झाली आहे. कादंबरीने केलेले विविध प्रयोग आकाशवाणी क्रमशः वाचन अशा विविध स्वरूपातून ही कादंबरी सबंध महाराष्ट्रात मैलाचा दगड ठरली आहे. अशा बहुचर्चित कादंबरीला महाराष्ट्रातील 24 नामवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अशोक कुबडे लिखित 'गोंडर' या कादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने सबंध साहित्य क्षेत्रात अशोक कुबडे यांचा गौरव आणि कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे. इसाप प्रसिद्ध केलेली ही कादंबरी आज सर्व सर्व दूर पोहोचले आहे या घवघवीत यशाबद्दल लेखक अशोक कुबडे यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
_______________________________
Comments
Post a Comment