किनवट ता. प्रतिनिधी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महा परिनिर्वाण दिना निमित्त साने गुरुजी रुग्णालयात अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरवातीस राजेश पाटील यांनी बुद्ध वंदना घेतली तर सुत्र संचालन अंजिक्य कयापाक यांनी केले यावेळी सानेगुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे खडतर जिवन जगले व परीस्थिती बदलून भारताला नवी दिशा दिली , सर्व जाती धर्मातील लोकांना एका माळेत ओवले व भेदभाव मिटवला तसेच भारता विषयक दृष्टिकोन , सामाजिक कार्य , संविधान उभारणीतील सिहंचा वाटा या विषयी सविस्तर अशी माहिती दिली यावेळी
,अजिंक्य कयापाक ,परमेश्वर कदम , विपीन पवार ,शेकन्ना बंडेवार , डॉ. भाग्यश्री बेलखोडे वरटकर ,नितीन भडंगे ,अर्चना डोंगरे व साने गुरुजी रुग्णालय कर्मचारी स्टॉफ इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment