Skip to main content

परभणी घटनेच्या निषेधार्थ किनवट मध्ये कडकडीत बंद




किनवट,ता.१६ : सर्व पक्षीय आंबेडकरवादी व संविधानप्रेमी कृती समितीच्या वतीने आज(दि.१६) दिलेल्या किनवट बंदच्या हाकेला १०० टक्के

प्रतिसाद  मिळाला.

  कृती समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गाने फिरुन मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला.एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन सादर केले.निवेदनात नमुद केले आहे की,परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपीना तात्काळ अटक करून परभणीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात अपशयी ठरलेल्या पोलीस अधिका-यावर निलंबनाची कारवाई करा.

   परभरणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही जातीयवादी समाजकंटाकडुन  १० डिसेंबर रोजी तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परभणीतील आंबेडकरी समुदायाने  १२ डिसेंबर रोजी बंदची हाक दिली होती. या बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती आबाधीत राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी परभणी पोलीसांची होती. परंतु, परभणी पोलीसांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे परिस्थिती चिघळली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थीतीला परभणीचे पोलीसच पूर्णतः जबाबदार असतांना मात्र त्यासाठी आंबेडकरी समुदयांला जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीसाकडून अन्याय- अत्याचार करण्यात येत आहेत. पोलीसांच्या या दंडेलशाहीचा आम्ही किनवट तालूक्यातील सर्वपक्षीय आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी नेते, कार्यकर्ते व नागरीक जाहिर निषेध करतो,असे नमुद केले आहे. 

  परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करुन विटंबना करणाऱ्या मुख्यसुत्रधाराचा तात्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणातील आरोपीविरुध्व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकत्याचा न्यायालयीन कोठडीत १५ डिसेंबर  रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन पोलिस निरीक्षक अशोक घोरखंड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकत्याच्या कुटुंबीयाना शासकिय निधीतुन ५० लाख रुपये मदत द्या,निष्पाप आंबेडकरी नागरीक विशेषतः तरुणावर एफआयआर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजनबध्दरितीने राबविण्यात येणारे परभणी येथील पोलीसांचे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा,परभणीतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करुन त्यांना निलंबीत करा आणि त्यांची विभागीय चौकशी करि,१२ डिसेंबर रोजी परभणी येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाण्यास पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड ही जबाबदार असून त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना तात्काळ निलंबीत करा,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

    निवेदनावर  दादाराव कयापाक रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष,विनोद भरणे पीपल्स रिपलब्लीन पार्टी, नांदेड जिल्हा अध्यक्ष,

अॅड. मिलिंद सर्पे तालूका विधी सेवा समिती सदस्य, अरुण आळणे माजी नगराध्यक्ष,शंकर नगराळे, अध्यक्ष शांती भुमी,

विजय पोलसवार नाभीक महामंडळ महा. प्रदेश कार्यकारीणी सदस्य,प्रविन गायकवाड सामाजिक कार्यकर्ता,विवेक ओंकार तालूका अध्यक्ष, रिपाइं (आठवले),राहुल सर्पे,सामाजिक कार्यकर्ता,निखील दिपक वाघमारे, ता. अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी किनवट ,अॅड. सम्म्राट सर्पे, युवा पॅथर, तालुका अध्यक्ष,मिलिंद कांबळे,निखील कावळे सुगध नगराळे तालूका अध्यक्ष (युवक अध्यक्ष) राष्ट्रवादी अजितपवार गट,दिनेश कांबळे वंचित बहुजन आघाडी ता. उपाध्यक्ष

गंगुबाई परेकार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...