किनवट: प्रबोधन चळवळीतील शिलेदार शाहीर नरेंद्र दोराटे यांनी लिहिलेल्या भीम क्रांती सूर्य गीत संग्रहाचे प्रकाशन विद्यानगर गोकुंदा येथील तक्षशिला बुद्ध विहारात साहित्यिक डॉ.प्रा.पंजाब शेरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी साहित्यिक प्रा.गजानन सोनोने,उप प्राचार्य सुभाष राऊत, पांडुरंग साळवे, पत्रकार दिलीप पाटील,मुख्याध्यापक प्रदीप कांबळे ,मोहनराव गच्चे,यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी साहित्यिक महेंद्र नरवाडे व सागर शेंडे यांनी वंदना घेतली.याप्रसंगी प्रा. डॉ.पंजाब शेरे यांनी शाहीर नरेंद्र दोराटे यांनी लिहिलेल्या या तिसऱ्या पुस्तकांचे विमोचन करताना*भीम क्रांती सूर्य*या गीत संग्रहातील महामानवांची गीते अतिशय प्रेरणादायी असून जिजाऊ,छ.शिवराय,फुले,शाहु, आंबेडकर,रमाई,बिरसा मुंडा, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करणारी आहेत असे प्रतिपादन केले.याप्रसंगी विद्यानगर येथील मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
Comments
Post a Comment