किनवट/प्रतिनिधीः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर बोर्ड कार्यकारणीवर माध्यमिक शिक्षक संवर्गातून अशासकीय सदस्य म्हणून येथील कॉस्मापॉलिटन विद्यालय येथील सहशिक्षक बाळकृष्ण देवराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीने लातूर विभागीय मंडळावर एकूण 14 विविध व्यक्तींची अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यात येथील उपक्रमशील शिक्षक बाळकृष्ण कदम यांचा समावेश आहे सदर नियुक्ती बद्दल नियुक्ती बाळकृष्ण कदम यांचे सर्व सहकारी व मित्र मित्र मंडळातर्फे भरभरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment