Skip to main content

किनवट उपकेंद्रात स्व. उत्तमराव राठोड यांची ९६ वी जयंती उत्साहात साजरी, AI तंत्रज्ञानाद्वारे घुमला स्व. उत्तमरावांचा आवाज





​किनवट : प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संचलित कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (उपकेंद्र), किनवट येथे माजी खासदार स्व. उत्तमरावजी राठोड यांची ९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत, किनवटच्या सर्वांगीण विकासातील त्यांचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत जाधव यांनी स्व. उत्तमराव राठोड यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, "किनवटचा आज जो विकास आपल्याला दिसतो, त्यामागे उत्तमरावजींचा अत्यंत दूरदृष्टीकोन होता. त्यांनी घातलेल्या पायाभरणीमुळेच या दुर्गम भागाला विकासाची नवी दिशा मिळाली आहे." त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाष्याला उपस्थित विद्यार्थ्यांनी दाद दिली.


​AI तंत्रज्ञानाचा अनोखा प्रयोग

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर. डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी या तंत्रज्ञानाद्वारे स्व. उत्तमराव राठोड यांचा आवाज पुनरुज्जीवित केला. केंद्राच्या भविष्यातील वाटचालीबद्दल खुद्द उत्तमरावजींच्या आवाजात त्यांच्या भावना व्यक्त झाल्याने उपस्थित जनसमुदाय भावूक झाला होता.


मुख्य मार्गदर्शक डॉ. समाधान दराडे यांनी उत्तमरावजींच्या जीवनप्रवासाचा संक्षिप्त आढावा घेत त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 


अध्यक्षीय समारोप करताना केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड म्हणाले की, "कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली हे केंद्र आधुनिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र म्हणून देशात आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे हीच खरी स्व. उत्तमराव राठोड यांना आदरांजली आहे.

याप्रसंगी हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत राठोड, सामाजिक कार्यकर्ते विनायक गव्हाणे, डॉ. सुनील व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. श्रेयस पवार यांनी केले. आभार चेतन जाधव यांनी मानले.

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह-प्राध्यापक डॉ. प्रमोद राठोड, प्रा. श्रीकांत दुधारे, रमेश जाकुलवार यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...