Skip to main content

10 केंद्रावर 123 सीसीटीव्हीच्या नियंत्रणात 3525 विद्यार्थी देणार 12 वीची परीक्षा # कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यास प्रशासन सज्ज


किनवट : मंगळवारी (ता.10) इयत्ता 12 वीच्या परिक्षेस प्रारंभ होणार असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी केली असून तालुक्यातील 10 केंद्रावर तीन हजार पाचशे पंचेवीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

     सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या अध्यक्षतेखाली उप विभागातील किनवट व माहूर तालुक्यातील केंद्र संचालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर (किनवट) , अभिजीत जगताप (माहूर) , पंचायत समिती , उप विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे , माहूरचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस , गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने (किनवट) , संतोष शेटकार (माहूर) , विस्तार अधिकारी ( पं) वसंत वाघमारे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , सहायक परिरक्षक शेषराव पाटील (माहूर) व समशीर खान (किनवट) यांची प्रमुख उपस्थिती होती.

     जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष राहूल कर्डिले , मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली , जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (मा) तथा  जिल्हा दक्षता समिती सदस्य सचिव माधव सलगर यांच्या नेतृत्वात यावर्षी कापीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी उचित तयारी केली आहे.

     सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला, किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर व पंचायत समिती किनवटच्या गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार , विस्तार अधिकारी यांचे भरारी पथक जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केले आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर पंचायत , शिक्षण , महसूल , कृषि व बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांचे बैठे पथक परीक्षा संपेपर्यंत ठाण मांडून राहणार आहे. किनवट तालुक्यात 10 परीक्षा केंद्र असून 3502 विद्यार्थी परिक्षेस बसले आहेत. 142 वर्गखोल्यात 3510 ड्यूल डेस्क चीव्यवस्था केली असून प्रत्येक वर्गखोलीवर  123 सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. अशी माहिती गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिलकुमार महामुने यांनी दिली.

     उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त सर्व ठाणेदारांनी चोख पोलीस बंदोबस्त आखला आहे.

    

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...