Skip to main content

न्यायाचा दरवाजा सर्वांसाठी खुला ठेवण्याचे विधी सेवा समितीचे ध्येय : न्या. पी. एम. माने कायद्याबाबत सजग व्हा, न्याय मिळवण्यासाठी पुढे या – नागरिकांना आवाहन

 


किनवट : “समाजातील आदिवासी, वंचित, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध आहे. कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी कायदेशीर मदतीचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत किनवट सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आणि  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष पी. एम. माने यांनी व्यक्त केले.


 राज्यपाल दत्तक गाव    जवरला (ता. किनवट) येथे शनिवारी(दि. २२) तालुका विधी सेवा समिती, किनवट यांच्या मार्फत आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात ते अध्यक्षीय समारोप करताना  बोलत होते.


 ||न्याय मिळवण्यासाठी पुढाकार आवश्यक – न्यायाधीश माने||

न्या. माने म्हणाले की, “कायदा हा सर्वांसाठी समान आहे. अनेकांना योग्य मार्गदर्शन नसल्याने ते अन्याय सहन करतात. विधी सेवा समिती विनामूल्य कायदेशीर मदत, मार्गदर्शन आणि आवश्यक दस्तऐवजीकरण उपलब्ध करून देते. नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”


|| विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन||

शिबिरात उपस्थित वकील मंडळींनी खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले :


राष्ट्रीय शिक्षण धोरण

संविधान व मूलभूत अधिकार

आदिवासी हक्क आणि शासकीय योजना

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका

सायबर गुन्हे प्रतिबंध आणि कायदेशीर उपाय

महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक कायदे इत्यादी

|| मान्यवरांची उपस्थिती||

कार्यक्रमाला अॅड. के. के. मुनेश्वर (अध्यक्ष, अभिवक्ता संघ, किनवट), वसंत वाघमारे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती), अॅड. डी. जी. काळे, अॅड. आर. डी. सोनकांबळे, अॅड. व्ही. एस. सूर्यवंशी, अॅड. पी. पी. गावंडे, वकील संघाचे उपाऊ अॅड. टी. आर. चव्हाण, अॅड. मिलिंद सरपे, अॅड. सुनील येरेकार, अॅड. आर. पी. पुरुषोत्तमवार, अॅड. पंडित घुले, अॅड. सचिन तलांडे, अॅड. संकेत राठोड, अॅड. दीपा सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


|| ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग||

या शिबिरास सरपंच नमिता गेडाम, माधवराव मरस्कोले, संतोष चांदेकर, गजानन मरस्कोले, राहुल लिंगमपेलिवार, सुमंबाई शेंद्रे, मोतीबाई तुमराम, समदूरा कुमरे, ग्राम अधिकारी पांचाळ, रामराव खामनकर यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव शेंद्रे यांनी केले.


कायद्याविषयी जागरूकता, नागरी हक्कांची समज, आणि न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर साधनांचा प्रभावी वापर करण्याचे मोलाचे मार्गदर्शन या शिबिरातून ग्रामस्थांना मिळाले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...