Skip to main content

Posts

Showing posts from November, 2024

एआय एम आय एम च्या तालुका उपाध्यक्षपदी सय्यद नदीम यांची एकमताने निवड

  (किनवट ता. प्रतिनिधी) किनवट तालुक्यात सामाजिक कार्यासाठी लोकप्रिय असलेले टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सय्यद नदीम यांची ए आय एम आय एम च्या तालुका उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली जिल्हाध्यक्ष मिर्झा अमजद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गब्बर काझी यांच्या नेतृत्वाखाली किनवट माहुर विधानसभा अध्यक्ष सरदार भाई, शहराध्यक्ष फहीम कुरेशी, सचिव अमिर खान, तालुका सचिव अमिर भाई, तोफीक भाई या सह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती . या निवडी बद्दल किनवट माहुर तालुक्यातुन पत्रकार , राजकीय नेते, टि. सु. ब्रिगेड तथा मित्र मंडळीकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

अत्यंत चुरशीची ठरलेली किनवट / माहुर विधानसभा निवडणुकीत भिमराव केराम यांचा ९२०२८ मतांनी विजयी

  किनवट/ माहुर विधानसभेची निवडणूक लढत हि अत्यंत चुरशीची ठरलेली होती  यात दिग्गज नेते मंडळीची प्रतिष्ठा पणाला लागली होती भिमराव केराम व प्रदिप नाईक यांच्यात सरळ लढतीत भिमराव केराम यांना ५६४८ फरकाने  ९२०२८ मत पडले तर प्रदिप नाईक यांना  ८६३७९ मत पडुन ते पराभुत झाले (किनवट ता. प्रतिनिधी) 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी घोषित झाले असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी 92028 इतके मतदान घेऊन दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे. या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला असून यावेळेला महायुतीसरकार मध्ये भीमराव केराम यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. 83 किनवट विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली सकाळी 7 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया झाली या वेळेला एकूण 17 उमेदवार रिंगणात होते महायुतीचे भीमराव केराम व महाविकास आघाडीचे प्र...

गोकुंद्यात तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क स. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांची होती उपस्थिती

  किनवट : 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 222 सुसंस्कार मतीमंद विद्यालय, गोकुंदा येथे तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांची उपस्थिती होती. गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत हबीब कॉलनी येथे असलेल्या सुसंस्कार मतीमंद विद्यालयातील 222 मतदान केंद्राच्या यादीत शहाना हसीना शेख , सलमा शेख , मुस्कान शेख , ज्यूली किशन सुर्यवंशी, साक्षी सरोदे, मोना पांडुरंग या तृतीय पंथी मतदारांची नावे आहेत. हे मतदार मतदानासाठी आले तेव्हा सहायक जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे)  तसेच  मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे , मल्लीकार्जून   स्वामी , रुपेश मुनेश्वर , सुरेश पाटील , शेषराव पाटील , मनोज कांबळे , बीएलओ गंगासागर मुखाडे आदिंची उपस्थिती होती.

जिल्हा निवडणुक अधिकारी झाले प्रशिक्षणार्थी....

किनवट - ८३ किनवट विधानसभा मतदार संघांतर्गत नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण भेटी प्रसंगी जिल्हधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत हे चक्क प्रशिक्षणार्थीच्या शेजारी बसून प्रशिक्षणार्थी झाले व त्यांनी सर्व नमुने सराव अभ्यासात भाग घेतला. मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल येथे मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या सत्रात २ तास पीपीटी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण व पुढील १ तासात प्रत्येकी ४० प्रशिक्षणार्थी एका वर्गखोलीत मतदान यंत्र हाताळणी असे नियोजन होते. या प्रशिक्षणाची पाहणी करण्यासाठी नांदेडचे जिल्हधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत (भाप्रसे) यांनी भेट दिली. यावेळी सर्व क्षेत्रीय अधिकारी सहायक क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर वर्गखोली निहाय मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण देत होते. त्यांनी थेट वर्गखोलीत प्रवेश करून प्रशिक्षणार्थीच्या बाकावर बसले. त्यावेळी मतदानाच्या दिवशी भरण्यात येणारी विविध नमुने कसे भरायचे? या नमुन्यांचा सराव अभ्यास सुरू होता.त्यांनी ती प्रश्न पत्रिका-उत्त...

महाविकास आघाडीचे उमेदवार मा.प्रदीप नाईक यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

  किनवट (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षातील दिव्यांग लोकांना विद्यमान आमदार केराम कडून वेळोवेळी हक्काचा असलेल्या  स्थानिक विकास निधी वाटप साठी पाठपुरावा करूनही राखीव निधी वाटप न केल्याने आणि त्यांचे घरचे फक्तं उंबरठे झिवून आलेल्या वाईट अनुभवातून किनवट माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांचा अखिल भारतीय अपंग कामगार संघटना शाखा किनवट आणि माहूर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मा.प्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना अमोल कोल्हे यांचा सभेत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.    किनवट व माहूर तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून शासन दरबारी नोंद आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये किनवट व माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्याकडे संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याबाबत विनंती अर्ज सादर करूनही आमदार भीमराव केराम यांनी खर्च केले नाही.दिनांक ०१/१२/२०२२ रोजी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून पत्र क्र. २०५० भीमराव केराम यांना देऊन आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्...

तुम्ही फक्त प्रदिप नाईकांना निवडून द्या किनवट/ माहुरला लाल दिवा देण्याच काम शरद पवार करतील- डॉ. अमोल कोल्हे

किनवट तालुका प्रतिनिधी- तुम्ही फक्त प्रदिप नाईकांना निवडुन द्या किनवट माहुर ला लाल दिवा द्यायची जबाबदारी आमची स्वतः मी वकीली करत शरद पवारांना साकड घालतो असे प्रतिपादन संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले  सुभाषचंद्र बोस यांनी म्हटल होत तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा तसच तुम्ही फक्त आशिर्वाद द्या किनवट / माहुर ला लाल दिवा  देण्याची जबाबदारी आमची प्रदीप नाईक हे १५ वर्षा पासुन किनवट माहुर जनतेची सेवा केली म्हणून त्यांची लोकप्रियता जनतेच्या मनात घर करून आहे . यावेळी मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदिप नाईक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे स्टार प्रचारक , राज्य सरचिटणीस दादासाहेब शेळळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष रक्षनाताई सलगर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी मंत्री सुर्यकांताताई पाटील, मा. माधव किन्हाळकर, मा. खाजा बेग, उबाठाचे डॉ. बि.डी. चव्हाण, समनक पार्टीचे संदेश चव्हाण, विधानसभा अध्यक्ष किनवट माहुर उबाठाचे ज्योतीबा खराटे, काँग्रेसचे ता. अध्यक्ष सुर्यकांत रेड्डी, निरंजन केशवे, गिरीश नेम्मानिवार, व्यकंट ...

निवडणुक खर्चाची १६ नोव्हेंबरला तिसऱ्यांदा तपसणी

किनवट- दि. 14 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 83- किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी गुरुवारी 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत 83- किनवट विधानसभा मतदार संघाकरिता नियुक्त खर्च निरिक्षक मयंक पाण्डेय (आयआरएस) यांच्या उपस्थितीत निवडणूक खर्च तपासणी कक्ष, आय. टी. आय., किनवट येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करणे करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद...

१५ रोजी डॉक्टर अमोल कोल्हे यांची किनवट येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

किनवटः महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता एन के गार्डन समोरील मैदानात संपन्न होणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात आले आहे. या सभेस संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष रक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे प्रवक्ता नितेश कराळे गुरुजी, स्टार प्रचारक तथा राज्याची चिटणीस दादासाहेब शेळके, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, आर्णी चे आमदार खाजाबेग, शिवसेना नेते डॉक्टर बी डी चव्हाण, समनक जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संदेश चव्हाण, शिवसेनेचे (उबाठा) विधानसभा अध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, काँग्रेसचे निरंजन केशवे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लातूर विभागीय शिक्षण मंडळावर बाळकृष्ण कदम यांची नियुक्ती

  किनवट/प्रतिनिधीः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर बोर्ड कार्यकारणीवर माध्यमिक शिक्षक संवर्गातून अशासकीय सदस्य म्हणून येथील कॉस्मापॉलिटन विद्यालय येथील सहशिक्षक बाळकृष्ण देवराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीने लातूर विभागीय मंडळावर एकूण 14 विविध व्यक्तींची अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यात येथील उपक्रमशील शिक्षक बाळकृष्ण कदम यांचा समावेश आहे सदर नियुक्ती बद्दल नियुक्ती बाळकृष्ण कदम यांचे सर्व सहकारी व मित्र मित्र मंडळातर्फे भरभरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

निवडणुक निरीक्षक श्री. कुमार यांनी घेतला किनवट/ माहुर विधानसभा मतदारसंघाचा आढावा

  किनवट : निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणुन श्री शैलेंद्र कुमार भा.प्र.से. यांनी ८३- किनवटविधानसभा मतदार संघातील निवडूक विषयक कामकाजाचा आढावा घेवून काही मार्गदर्शक सूचना केल्या. श्री शैलेंद्र कुमार यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्र. 7499127265 हा आहे. Observer code-G-35602 हा आहे. ते ८३ किनवट विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. सर्व नोडल अधिकारी यांची बैठक घेवुन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांची आदर्श आचार संहितेबाबत बैठक घेवुन मार्गदर्शन केले. सदर बैठकीस मा. निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, किशोर यादव, अजय कुरवाडे, ना. तहसिलदार महमद रफीक, राजकुमार राठोड, रामेश्वर मुंडे हे उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या किनवट - माहुर येथील उमेदवाराने विष प्राशन केले

  किनवट: किनवट /माहुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार गोविंद जेठेवाड यांनी आज (मंगळवार) दुपारी विषारी औषध - प्राशन केले. त्यांना कार्यकर्त्यांनी तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार करुन जेठेवाड यांना तेलंगणातील आदिलाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविले आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते गोविंद जेठेवाड यांनी औषध प्राषन केलेले कारण मात्र कळू शकले नाही. क आज दि. ५ नोव्हेंबर दुपारची थरारक घटना होय. किनवट विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. ऐन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतच हा प्रकार घडला आहे. एका बैठकीदरम्यान ही घटना घडल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या घटनेनंतर जेठेवाडांना गोकुंद्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी गांभीर्य ओळखून पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्याच्या आदिलाबादकडे तात्काळ पाठवले आहे. दरम्यान किनवट पोलीसांनीही घटनेची नोंद प्रक्रीया चालू असल्याने माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

@भाऊबीज

भाऊबीज, ज्यालाच भाई दूज असं ही  संबोधले जाते, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणींच्या अनोख्या नातेसंबंधाचा सन्मान करतो. दिवाळीच्या पाचव्या दिवशी होणार्‍या हा सण भारतातील लाखो लोक आणि जगभरातील भारतीय लोकांनी या सणाला हृदयात विशेष स्थान दिले आहे. भाऊबीज उत्सवाचे महत्त्व संस्कृती आणि इतिहास या दोन्हींमध्ये खोलवर रुजलेले आहे. देशभरात साजरे होणाऱ्या अनेक सणांपैकी, याचे मूळ प्राचीन भारतात असल्याचे मानले जाते. या दिवशी बहिणी आपल्या भावांना त्यांच्या घरी आणतात, जेव्हा ते आरती करतात आणि त्यांच्या सुख आणि यशासाठी आशीर्वाद मागतात. बदल्यात, त्यांच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे चिन्ह म्हणून, भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात. दिवाळी व भाऊबीज हा सण बहीण- भावाच्या नात्याला दृढ करणारा असतो. आपल्या संस्कृतीत भाऊबीजेला बहिण आपल्या भावाला करदोडा देते. करदोडा हा मानाचा, सन्मानाचा तसेच तो नाते दृढ करणारा असतो. दिवाळीत-भाऊबीज विशेष महत्वाची. नात्याना घट्ट करणारे हे सगळं एक धागा बांधून ठेवतो. ते पिढ्या न पिढीच्या संबंधाला रक्ताच्या नात्याला आणि त्याच्या पल्याड जाऊन ऋणानुबंधाला करदोडा आपण बहीण-...

अतिदुर्गम असलेल्या वाघदरी गावास मतदान केंद्र मंजुर

  किनवट : पक्का रस्ता नसलेल्या डोंगर-दऱ्यातून पायपीट करून ये-जा करावे लागणाऱ्या तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी, सीमावर्ती वाघदरी गावात स्वतः पायी चालत जावून समस्या जाणून घेऊन विधानसभा निवडणूकी करिता शासनाकडे पाठपुरावा करून मतदान केंद्रास मान्यता मिळवून दिल्याने ग्रामस्थांनी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांचे आभार मानले आहे. अडीचशे लोकवस्तीचं वाघदरी गाव जलधारा गावापासून पूर्वेस सुमारे 8 किमी अंतरावर आहे. या गावची ग्रामपंचायत कुपटी (बु) ही येथून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सोडल्यास इतर कोणतेही शासकीय उपक्रम पोहचले नाहीत. ग्रामस्थ पिण्याचे पाणी दऱ्या - खोऱ्यातील चेलम्यातूनच मिळवून आपली भूक - तहान भागवितात. तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्वप्रथम या गावाला पायपीट करत भेट दिली होती. खऱ्या अर्थाने तेव्हापासून शासकीय योजना या गावाच्या दिशेने वळू लागल्या. विद्यमान सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी महसूल दिनाचे औचित साधून या गावातील वन जमिनी कसणारांना वन हक्क प्रमाण पत्र वाटप केले. त्यावेळी ग्रामस्थ...