किनवट:
किनवट /माहुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार गोविंद जेठेवाड यांनी आज (मंगळवार) दुपारी विषारी औषध - प्राशन केले. त्यांना कार्यकर्त्यांनी तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार करुन जेठेवाड यांना तेलंगणातील आदिलाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविले आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
सामाजिक कार्यकर्ते गोविंद जेठेवाड यांनी औषध प्राषन केलेले कारण मात्र कळू शकले नाही. क आज दि. ५ नोव्हेंबर दुपारची
थरारक घटना होय. किनवट विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. ऐन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतच हा प्रकार घडला आहे.
एका बैठकीदरम्यान ही घटना घडल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या घटनेनंतर जेठेवाडांना गोकुंद्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी गांभीर्य ओळखून पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्याच्या आदिलाबादकडे तात्काळ पाठवले आहे. दरम्यान किनवट पोलीसांनीही घटनेची नोंद प्रक्रीया चालू असल्याने माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
Comments
Post a Comment