किनवट (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षातील दिव्यांग लोकांना विद्यमान आमदार केराम कडून वेळोवेळी हक्काचा असलेल्या स्थानिक विकास निधी वाटप साठी पाठपुरावा करूनही राखीव निधी वाटप न केल्याने आणि त्यांचे घरचे फक्तं उंबरठे झिवून आलेल्या वाईट अनुभवातून किनवट माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांचा अखिल भारतीय अपंग कामगार संघटना शाखा किनवट आणि माहूर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मा.प्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना अमोल कोल्हे यांचा सभेत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
किनवट व माहूर तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून शासन दरबारी नोंद आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये किनवट व माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्याकडे संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याबाबत विनंती अर्ज सादर करूनही आमदार भीमराव केराम यांनी खर्च केले नाही.दिनांक ०१/१२/२०२२ रोजी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून पत्र क्र. २०५० भीमराव केराम यांना देऊन आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दिव्यांग (नेत्रहिन,शारीरिक अपंग,मुखबधीर,कर्णबधिर,शारीरिक व मानसिक विकलांग ) यांना प्रतिवर्षी १० लक्ष रुपये खर्च करण्यासंबंधी पत्र दिले होते; परंतु आमदार भीमराव केराम यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवून दिव्यांगांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे.
माजी आमदार प्रदीप नाईक यांनी संघटनेकडे स्वतः येऊन मी आमदार झाल्यानंतर किनवट व माहूर तालुक्यातील सर्व दिव्यांगांना न्याय मिळवून देईल असे शब्द संघटनेला दिले आहे. म्हणून संघटनेने दि १५/११/२०२४ रोजी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मा.प्रदीप नाईक रा.कॉ.प. शरदचंद्र पवार अधिकृत उमेदवार यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटना शाखा किनवट माहूर संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment