किनवट/ माहुर विधानसभेची निवडणूक लढत हि अत्यंत चुरशीची ठरलेली होती यात दिग्गज नेते मंडळीची प्रतिष्ठा पणाला लागली होती भिमराव केराम व प्रदिप नाईक यांच्यात सरळ लढतीत भिमराव केराम यांना ५६४८ फरकाने ९२०२८ मत पडले तर प्रदिप नाईक यांना ८६३७९ मत पडुन ते पराभुत झाले
(किनवट ता. प्रतिनिधी)
83 किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी घोषित झाले असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी 92028 इतके मतदान घेऊन दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे. या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला असून यावेळेला महायुतीसरकार मध्ये भीमराव केराम यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
83 किनवट विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली सकाळी 7 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया झाली या वेळेला एकूण 17 उमेदवार रिंगणात होते महायुतीचे भीमराव केराम व महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात तुल्यबळ लढत झाली. चौदाव्या फेरीपर्यंत प्रदीप नाईक आघाडीवर होते त्यानंतर त्यांची पीछेहाट सुरू झाली ती अंतिम फेरीपर्यंत कायम राहिली.
पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालावरून भीमराव केराम यांना 92028 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रदीप नाईक यांना 86379 इतकी मते मिळाली. चूरशीच्या लढतीत भीमराव केराम हे 5649 इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले. प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वत्र तुतारीची चर्चा झाली असली तरी निकालात मात्र कमळाने बाजी मारली असून किनवट विधानसभेतील भीमराव केराम यांचा हा दुसरा विजय आहे.
या विजयानंतर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर एकच जल्लोष साजरा केला तर किनवट शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली या निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु तुल्यबळ लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
किनवट विधानसभेसह महाराष्ट्र राज्यात महायुतीने एकतर्फी विजय प्राप्त केला असून महायुतीच्या मंत्रिमंडळात किनवटचे आमदार भीमराव केराम यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. किनवट विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी, दुर्गम मागास म्हणून ओळखला जातो या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भीमराव केराम यांना मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
खालील तालुका निहाय मिळालेली मते
टपाली मतदान सोडून सविस्तर माहिती खाली दिल्या प्रमाणे
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024
83- किनवट विधानसभा मतदार संघ मतमोजणी
चोविसाव्या फेरी अखेर EVM वर नोंदविलेली सर्व मते Update
उमेदवारनिहाय मिळालेली मते
गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्टी :668
जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार :86379
भीमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी, :92028
अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो. रि.पा. :5307
डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी :4447
स. इमरान अली- इंडीयन नॅशनल लीग :199
गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्ष :136
जयवंता केसर पवार-अपक्ष :175
जाधव सचिन माधवराव (नाईक) अपक्ष :5482
जितेंद्र अनिलराव कुलसंगे-अपक्ष :257
दिलीप धरमसिंग जाधव नाईक-अपक्ष :542
धावारे राजेश नारायण-अपक्ष : 230
ॲड. प्रदिप देवा राठोड-अपक्ष :580
विजय काशीनाथ खुपसे-अपक्ष :1628
शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन-अपक्ष :624
संदिप निखाते-अपक्ष :374
संदीप पाटील कऱ्हाळे-अपक्ष :194
नोटा :1249
Comments
Post a Comment