किनवट -
८३ किनवट विधानसभा मतदार संघांतर्गत नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण भेटी प्रसंगी जिल्हधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत हे चक्क प्रशिक्षणार्थीच्या शेजारी बसून प्रशिक्षणार्थी झाले व त्यांनी सर्व नमुने सराव अभ्यासात भाग घेतला.
मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल येथे मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या सत्रात २ तास पीपीटी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण व पुढील १ तासात प्रत्येकी ४० प्रशिक्षणार्थी एका वर्गखोलीत मतदान यंत्र हाताळणी असे नियोजन होते. या प्रशिक्षणाची पाहणी करण्यासाठी नांदेडचे जिल्हधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत (भाप्रसे) यांनी भेट दिली.
यावेळी सर्व क्षेत्रीय अधिकारी सहायक क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर वर्गखोली निहाय मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण देत होते. त्यांनी थेट वर्गखोलीत प्रवेश करून प्रशिक्षणार्थीच्या बाकावर बसले. त्यावेळी मतदानाच्या दिवशी भरण्यात येणारी विविध नमुने कसे भरायचे? या नमुन्यांचा सराव अभ्यास सुरू होता.त्यांनी ती प्रश्न पत्रिका-उत्तर पत्रिका पाहिली. -८३ किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. मतदान प्रक्रिया संपवून साहित्य स्विकारतांना नोंदविलेल्या मतांचा हिशोब (१७-सी), मतदान केंद्राध्यांची दैनंदिनी व मतदार नोंदवही (१७-ए) सदोष आढळतात. परंतु अशा सराव अभ्यासाने त्या आता अचूक येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मातोश्री कमलताई ठमके बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Comments
Post a Comment