तुम्ही फक्त प्रदिप नाईकांना निवडून द्या किनवट/ माहुरला लाल दिवा देण्याच काम शरद पवार करतील- डॉ. अमोल कोल्हे
किनवट तालुका प्रतिनिधी-
तुम्ही फक्त प्रदिप नाईकांना निवडुन द्या किनवट माहुर ला लाल दिवा द्यायची जबाबदारी आमची स्वतः मी वकीली करत शरद पवारांना साकड घालतो असे प्रतिपादन संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले
सुभाषचंद्र बोस यांनी म्हटल होत तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा तसच तुम्ही फक्त आशिर्वाद द्या किनवट / माहुर ला लाल दिवा देण्याची जबाबदारी आमची प्रदीप नाईक हे १५ वर्षा पासुन किनवट माहुर जनतेची सेवा केली म्हणून त्यांची लोकप्रियता जनतेच्या मनात घर करून आहे .
यावेळी मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदिप नाईक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे स्टार प्रचारक , राज्य सरचिटणीस दादासाहेब शेळळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष रक्षनाताई सलगर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी मंत्री सुर्यकांताताई पाटील, मा. माधव किन्हाळकर, मा. खाजा बेग, उबाठाचे डॉ. बि.डी. चव्हाण, समनक पार्टीचे संदेश चव्हाण, विधानसभा अध्यक्ष किनवट माहुर उबाठाचे ज्योतीबा खराटे, काँग्रेसचे ता. अध्यक्ष सुर्यकांत रेड्डी, निरंजन केशवे, गिरीश नेम्मानिवार, व्यकंट भंडारवार,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, फारुक चव्हाण, राहुल नाईक, के. मुर्ती, नौशाद खान, हसन लाला, परवीन शेख , प्रिति मुनेश्वर, अभय महाजन , साजीद खान, तथा असंख महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते लाखोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी अमोल कोल्हे यांच्या समक्ष दोन अपक्ष व एका पक्षाच्या अशा एकुण तिन उमेदवारांनी प्रदिप नाईक यांना जाहीर पाठिंबा दिला अशा आशयाचे पत्र दिले या वेळी लाखोच्यां संख्येने जनता उपस्थित होती.
Comments
Post a Comment