Skip to main content

एकीकडे दुःख, दुसरीकडे दिलासा, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, पण पत्नीला लॉटरी, सूत्रांची माहिती




महाराष्ट्र:-

 शि वसेनेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत आणि आज दिवसभर प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं.

हे बैठकांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली. पण हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी विरोध दर्शवल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली. त्यामुळे ते सुद्ध चिंतेत होते. अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे. शिवसेना पक्षाने हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. असं असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांना थोडासा दिलासादेखील दिला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली असली तरी त्यांना काहीसा दिलासा दिला आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याबाबतचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण या निर्णयाने भावना गवळी यांच्यासाठी मोठा राजकीय झटका बसणार आहे. भावना गवळी यांचं लोकसभेचं तिकीट कापलं जाईल अशी सातत्याने चर्चा होती. पण त्यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा होती. पण आता शिवसेनेकडून राजश्री पाटील

जाईल, अशी चर्चा होती. पण आता शिवसेनेकडून राजश्री पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा : शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित


वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटाबाबत अखेर अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे वाशिम-यवतमाळच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहिला. वाशिम-यवतमाळसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. याबाबत मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.


संजय राठोड काय म्हणाले?


"नामांकन दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. महायुतीच्यावतीने उद्या नामांकन पत्र दाखल करणार आहोत. या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः हजर राहणार आहेत. उमेदवाराबाबत आमचे वरिष्ठ नेता स्वतः त्यावेळेस घोषणा करतील", असं संजय राठोड म्हणाले


आहेत.


दरम्यान, संजय राठोड यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला देखील


प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका


मांडली. "आम्ही उद्या नक्कीच शेवटच्या दिवशी फॉर्म भरणार


आहोत. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर

आहोत. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होईल", अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. "राज्याचे आमचे वरिष्ठ तीनही नेते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची इच्छा असेल तर कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन निश्चितच केलं जाईल", अशी सूचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...