Skip to main content

विविध शैक्षणीक, सामाजिक उपक्रमानी शिव जयंती साजरी

 



किनवट:-

तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय .... चा जयघोष आणि विविध , सामाजिक ,शैक्षणीक उपक्रमांच्या आयोजनासह ३९४ वी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती किनवट शहरातील छत्रपती चौकात सोमवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे सकल मराठा समाजाच्यावतीने महिलांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले.




अभिवादन केले. शिवप्रेमींनी सर्वत्र ध्वज, पताकांनी सजविल्याने परिसर भगवे झाल्याचे भासत होते.


शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित विविध उपक्रमांत सोमवारी सकाळी ०८ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी छापील चित्रांमध्ये रंगभरण स्पर्धा, ०९ वाजता वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान, गोकुंदा ते छत्रपती चौकापर्यंत शिवप्रेमी तरण्याबांड युवकांनी दुचाकी रॅली शिस्तबद्ध काढून लोकांची मने जिंकली.


छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजे होते. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती, महिला सन्मान, निर्भिडता त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या या लोकोत्तर गुणांची आठवण करीत त्यांच्या इतिहासाचे स्मरण करून त्यांच्या पावन स्मृतीला उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.


छत्रपति शिवाजी महाराज की जय च्या उच्चरवातील घोषणांनी आसमंत निनादले होते. शिवजयंतीनिमित्त येथील मराठवाडा रक्तनिदान केंद्रातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दुपारी बारापर्यंत सुमारे ५० शिवप्रेमींनी रक्तदान केले. डॉ. वाकोडे मॅटर्निटी हॉस्पिटलतर्फे आरोग्य निदान शिबिर घेण्यात येऊन गरजू रुग्णांची मोफत तपासणी


करण्यात आली. यावेळी उपस्थितांना अल्पाहार देण्यात आला. दुपारी १२ वाजता सत्यपाल महार-  ाजांचे शिष्य सप्तखंजेरीवादक संदीपपाल महाराज यांचा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम गोंडराजे मैदानावर उत्साहात पार पडला. सायंकाळी ०५ वाजता डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत नांदेड येथील ढोल-ताशा पथकाचे सुंदर, मनमोहक संचलन सर्वांनाच भावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना माजी आमदार प्रदीप नाईक, सुधाकर भोयर, युवानेते सचिन नाईक, श्रीनिवास नेम्मानीवार, इसाखान सरदार खान, व्यंकटराव नेम्मानीवार, साजीदखान, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, के. मुर्ती, अनिल कन्हाळे-पाटील मारोती दिवसे-पाटील, सतिश बिराजदार, गिरीश नेम्मानीवार, सचिन कदम, गजानन कोल्हे, बालाजी मुरकुटे पाटील, दगडू भरकड, अजय कदम, सुशील कदमसह शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...