Skip to main content

म.ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर




किनवट: राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची ता.11 एप्रिल व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ता.14 एप्रिल रोजी संयुक्त जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरी होत असून या निमित्ताने जयंती समितीची कार्यकारीणी गठीत करण्यासाठी सिध्दार्थनगर येथील जेतवन बुध्दविहार येथे दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सायं.7 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विचार विमर्ष केल्यानंतर सर्वानुमते जयंतीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील यांची तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर यांची निवड करण्यात आली. 

     निवड करण्यात आलेली कार्यकारीणी पुढील प्रमाणे ः- अध्यक्ष -गौतम पाटील, उपाध्यक्ष-निखिल दि.कावळे/योगेश भवरे, सचिव-प्रशिक मुनेश्‍वर, सहसचिव - आकाश सर्पे/ संघर्ष घुले, कोषाध्यक्ष -सूरज भरणे/आकाश आळणे, सहकोषाध्यक्ष -स्वप्नील सर्पे/ निवेदक कानिंदे, संयोजक- सुरेश कावळे. संघटक पदी शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, सचिन कावळे, सुगत भरणे, रुपेश भवरे, राजू कावळे, प्रतिक नगराळे, पंकज नगारे व प्रसिध्दी प्रमुख म्हणून रवि कांबळे, राजेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

    बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.मिलिंद सर्पे हे होते. जयंती समितीसाठी मार्गदर्शक म्हणून दादाराव कयापाक, विनोद भरणे, माधव कावळे, रविकांत सर्पे, प्रकाश पाटील, अ‍ॅड.किशोर मुनेश्‍वर, सुरेश जाधव, शंकर नगराळे, चंद्रहार मुनेश्‍वर, विवेक ओंकार, मारोती मुनेश्‍वर, उध्दव भवरे, गंगाधर मुनेश्‍वर, मधुकर पाटील, ज्ञानेश्‍वर मुनेश्‍वर, किशन परेकार, नितीन कावळे, गौतम नगराळे, राजू भरणे, रमेश मुनेश्‍वर, उत्तम कानिंदे, अनात्मा कयापाक, राजू सर्पे, शिलरत्न पाटील हे राहणार आहेत.

     अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण या वर्षी जयंती निमित्त विशेष भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे जयंती मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौतम पाटील व सचिव प्रशिक मुनेश्‍वर यांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...