Skip to main content

असा रंगला चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम !

 



किनवट ( प्रतिनिधी ) : कमठाला केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, भीमराव कुरसंगे, तंटामुक्त समितीचे गोपीनाथ पाटील, योगेश राघू, विजय पावडे, अनंता बादड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य बक्षीसे देण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदविधर शिक्षक अंकुश राऊत यांनी, प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी, तर आभार विद्या श्रीमेवार ह्यांनी केले. तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे यांनी  तांत्रीक बाबी सांभाळली तर एकनाथ बादड आणि ग्रामशिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, युवक मंडळांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 



           कार्यक्रमाच्या प्रारंभी शुभ दिन आयो रे..या गीताने झाला. त्यानंतर कु. मंत्रा गुंजकर हिचे मी 'जिजाऊ बोलतोय ' सम्रदा बादड हिचे 'मी सावित्री बोलतोय ' साईनाथ बादड याचे 'मी शिवाजी बोलतोय.. 'मारुती मेडलकर याचे 'मी आंबेडकर बोलतोय ' प्रतिक गुंजकर याचे 'मी राजे संभाजी बोलतोय.. ' अशा विविध एकपात्रीचे सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

           स्कूल चले हम, आमच्या पप्पांनी गणपती आणला, बम बम बोले..या गीतावर इयत्ता पहिली दुसरीचे विद्यार्थी मारुती, गणराज, आर्यन, आरव, आरोही, वैष्णवी, प्रीती, त्रिशा, अनन्या हिने सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर गुलाबी शरारा, लावणी रिमिक्सवर तनु, रुद्रा, मारुती, स्वरा, श्रेया, आरती, काजल, श्रध्दा हिने अप्रतिम नृत्य सादर केले. श्रेया, मंत्रा, पायल, लक्ष्मी, राधा, प्रतिमा हिने मायभूमी जन्मभूमी, आदिवासी नृत्य, कोळी रिमिक्स या गीतावर बहारदार नृत्य करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. माझी सखी बायको मेली आणि लिलिपुट या विनोदी गाण्यावर रोहन, प्रतीक, योगेश, ऋषिकेश, शिवम, निशांत, मारुती, ऋतिक, वीर, साईनाथ, अभिषेक, स्वराज यांनी नृत्य करून प्रेक्षकात हशा पिकविला.

         तनु बादड हिचा तेलगु डान्स, मंत्रा गुंजकर हिचा शिवकन्या, पायल वाघमारे हिचा भीमकन्या, रूपाली पवार हिचा देश रंगीला, स्वरा कदम हिचा नऊवारी साडी, वैष्णवी बादड हिचा केळेवाली, मारुती मेंडलकर याचे काठी न घोंगड आणि पूर्वी धुर्वे हिचे वाजले की बारा या लावणीने प्रेक्षकांनी वाहवा केली. अनेकांनी शैक्षणिक साहित्य बक्षीसं देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...