Skip to main content

करंजी येथे विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी.

 


उमरखेड:  तालुक्यातील करंजी  येथे दि.21 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध  महासभा  शाखा  करंजी व जयंती  उत्सव समिती  करंजीच्या वतीने  नुकतेच  विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.

पंचशील  ध्वजारोहन  सकाळी मा. माधवराव कलाने  पाटील करंजी सोसायटीचे  अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमाचे  उदघाटन मा. राहुल कऱ्हाळे (प्रकल्प अधिकारी बार्टी यवतमाळ )यांचे हस्ते केले.


कार्यक्रमाचे  अध्यक्ष मा. विजयराव  खडसे ( माजी आमदार उमरखेड )तर कविसंमेलनाचे  अध्यक्ष मा. सुधाकर लोमटे (सुप्रसिद्ध साहित्यिक उमरखेड )यांनी पद भूषविले.

प्रमुख पाहूणे =मा. प्राचार्य मोहनराव मोरे (माजी नगराध्यक्ष  पूर्णा.),मा. किशोर  भवरे  दलितमित्र (महापौर  प्रतिनिधी  नांदेड ), धम्मदीप  काळबांडे(अध्यक्ष भा. बौद्ध महा उमरखेड तालुका )उत्तम कानिंदे (स्तंभलेखक  किनवट ),प्रा. मुनेश्वर मॅडम,रंजना वाघमारे सामाजिक कार्यकर्त्या  बिटरगांव,शुद्धोधन घुगरे  (सरपंच  करंजी ) निवृत्ती काळबांडे, अनिल कांबळे ( सावळेश्वर,पोलीस पाटील )संगीताताई कलाने  (पोलीस पाटील करंजी ) अभय  कांबळे बिटरगाव,युवराज कलाने पाटील  (इंजि.)हे उपस्थित होते.


आंबेडकऱी कविसंमेलनात सहभागी  कवी


किनवटचे साहित्यिक कवी रमेश मुनेश्वर सर, महेंद्र  नरवाडे  सर, रुपेश  मुनेश्वर सर, प्रा. गजानन  सोनोने सर.

उमरखेड व परिसरातील कवी =प्रा. शा. द. रोकडे सर, सहदेव शिंगणकर, भारत  सूर्यवंशी, सुभाष  शिंगणकर, मारोती काळबांडे, नारायण पाटील, गरुड, दगडू  घुगरे, सुमेध  घुगरे आदी कविंनी बहारदार  रचना सादर  करून अनेकांची  मने जिंकली.


मा. विजयराव  खडसे मा. आमदार,यांनी महापुरुषांच्या जयंती सर्वत्र मनवल्या गेल्या पाहिजे असे प्रतिपादन केले व किशोर भवरे,यांनी देश विदेशातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे अनुभव व्यक्त केले तसेच  राहुल कऱ्हाळे  यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान व समाज कल्याण व बार्टीच्या स्टँड अप इंडिया मार्जिन मनी, स्वाधार योजना, निवासी शाळा, वसतिगृह, क दादासाहेब गायकवाड सबलीकरण डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना MPSC UPSC IBPS पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण व विविध योजनाची माहिती दिली. आणि आपल्या विचारातून जनतेवर  प्रकाश  टाकला.


संमोहन  कार्यक्रम


सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ  मा. नवनाथ  गायकवाड पुणे यांचा अंधश्रद्धा निर्मूलन आणि

समाजप्रबोधन  कार्यक्रम झाला.


सांस्कृतिक प्रबोधन


महाराष्ट्राचे  ख्यातनाम कवी  गायक  विजय पवार  व गायिका  संगीता  पवार (गायकवाड )आणि त्यांचा संच  मुदखेड  यांचा गायनाचा  वैचारिक सामना झाला.

परिसरातील  लोकं बहुसंख्येने   उपस्थित होते.


राजेश घुगरे अध्यक्ष भा. बौद्ध. महासभा  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे सर, बापुराव वाढवे तर

आभार  कविसंमेलनाचे  निमंत्रक -सुमेध  घुगरे , व दिशांत  घुगरे  यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  आयोजक भारतीय बौद्ध  महासभा  शाखा  करंजी व जयंती  उत्सव समितीच्या 

कार्यकर्त्यांनी  व तसेच  दत्ता वि. घुगरे, प्रकाश  सु. घुगरे  जयघोष घुगरे,कोंडबा गो.घुगरे, संभा का. घुगरे, जांबुवंतराव  घुगरे,गौतम घुगरे मिस्त्री,राहुल गायकवाड, राहुल घुगरे  अरुण घुगरे , सुनिल घुगरे, दुर्गेश काळबांडे,कोंडबा राऊत, सतिश  घुगरे, संदीप  गाडेकर, अमोल घुगरे, काशिनाथ  घुगरे  आणि  महिला  मंडळींनी सुद्धा यांनी अथक  परिश्रम  घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...