Skip to main content

पोलिसांचे समर्पण

 

     

                  ....इंग्रजांच्या काळात जसे लोक पोलिसांना घाबरायचे तसे आता जनतेने घाबरावे अशी कुणीही अपेक्षा करणार नाही. अलीकडे पोलिसांवर हल्ले वाढत असल्याचे दिसून येत आहे ,ही खरंच चिंतेची गोष्ट आहे. पण जशी जशी शिक्षण व्यवस्था प्रगत होत गेली, तशी लोकांची विचार करण्याची प्रगती पण झाली. त्यामुळे आज बर्‍याच लोकांना असे वाटते, की पोलीस आपल्या बळाचा योग्य वापर करतात पण तुम्हाला पोलिसांचे जनतेप्रती समर्पण कधीच दिसत नाही .पोलीस जनतेसाठी किती झटतात हे आम्हाला कधीच दिसले नाही का?

                पोलीस पैसे खातात असे बरेच लोक म्हणतात तुम्ही किती पैसे देता पोलिसांना तुमचे काम केल्यावर ?किती वेळा पैसे घेतल्याशिवाय पोलीसांनी  तुमचे काम केले नाही. का पैसे घेतल्याशिवाय पोलीस तुमचं काम करत नाहीत. असे किती व्हिडिओ आहेत, की ज्यामध्ये तुम्ही जर बाईक चालवत असाल तर तुम्हाला हेल्मेट घातले नसेल तर पोलिसांनी तुम्हाला हेल्मेट आणून दिले, आणि तुमचे प्राण वाचवले.

                               चोरी झाली पोलिसांना बोलवा, मंत्री आले पोलिसांना बोलवा, दरोडा पडला पोलिसांना बोलवा, गर्दी झाली पोलिसांना बोलवा, दहा रुपये वीस वीस रुपये साठी जनतेमध्ये खून होतात तेव्हा पोलिसच तुमच्या मदतीला येतो ना तुम्ही तर समजुतदारपणाने भांडणे मिटवून घेणार नाही.  तुम्ही जर गुन्हा केला तर तो लगेच मान्य करा पोलिसांनी वचक देईपर्यंत वाट कशाला पाहायची पोलीस जे तुम्हाला विचारतात ते तुम्ही जर खरं सांगितलं त्यांना सहाय्य दिलं तर ते तुमची मदत करतील.

                          तुम्ही बारा महिन्यातला प्रत्येक सण कसा साजरा करतात आणि पोलिस मात्र आपली ड्युटी करतो  तर कोणी सणावर काही भांडणे करू नाही अजून कोणतं समर्पण द्यावे पोलिसांनी ....  पोलीस पण एक माणूसच आहे त्याला पण कुटुंब आहे त्याला पण वाटते की आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करावा पण तो आपलं कर्तव्य  असतो. प्रत्येक पोलिसाला आपल्या कुटुंबाची ओढ असते. तो पण माणूसच आहे वर्दी घातली म्हणजे तू काय सर्व तुमच्या जबाबदाऱ्या झेलायला नाही. 

                               त्यांच्या घरी त्यांना लहान मुले असतात ते  त्यांची वाट पहात असतात ,आपले वडील कधी घरी येतात, तरी पण घरी जायच्या वेळेवर जर एखादे काम आले ,तर ते असं म्हणत नाहीत की माझी नोकरी संपली ,का मी आज जास्त काम केले, का  माझी जायची वेळ झाली ,ते आलेले आपले काम हातात घेऊन पूर्ण करतात ,घरदार- कुटुंब नंतर अगोदर काम असे ते म्हणतात.

                                 26/ 11 च्या घटनेमध्ये मध्ये पोलिसांचे किती मोठे समर्पण आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी आपल्या देशातल्या तसेच परदेशातल्याही लोकांचे प्राण वाचवले आणि काही पोलिसांनी तर आपल्या प्राणांची पण आहुती दिली आहे. बॉम्ब ब्लास्ट झाला तरी पोलीस आपले कर्तव्य निभावतात, पाऊस पडतो तेंव्हा पावसात उभे राहून कर्तव्य पार पाडतात.पावसामध्ये झाडे तुटणे, विजेचा वायर तुटणे,वीज पडणे असे अनेक घटना घडतात तरी ते आपले कर्तव्य पार पाडतात. अजून कोणते समर्पण द्यावे पोलीसांनी?

                         उन्हाळ्यात उन्हामध्ये, हिवाळ्यात थंडीत, पावसाळ्यात पाण्यात उभे राहून जनतेची सेवा आपल्या कर्तव्यापोटी करतात. निवडणुकीच्या काळात तर पोलिसांची खूपच जास्त प्रमाणात  परेशणि होते. गणपती असो देवी असो  यांच्या विसर्जनाच्या दिवशी तर त्यांना दोन-दोन दिवस पोलीस स्टेशनमध्ये थांबावे लागते. 

          माझ्या मुलाचा विवानच वाढदिवस होता तर  माझे मिस्टर प्रसाद वागरे (API मुंबई)  वाढदिवसाला येऊ शकले नाही ,माझ्या  विवानने पप्पांची खूप वाट बघितली पण ते येऊ शकले नाही कारण तो पिरेड करोनाचा होता त्यामुळे त्यांना सुट्टी  दिली नाही.ते आपले कर्तव्य बजावत होते. तुम्ही जनता पोलिसांना खूप नावे ठेवता पण प्रत्येक पोलीस आपल्या जीवनातल्या आशा कित्येक सुखाचे समर्पण देतो,ते  तुम्हाला समजणार नाही.

                        तुम्ही थोडं त्यांच्या जागी जाऊन नोकरी करा ,तेव्हा तुम्हाला समजेल. पोलिसांना म्हणावा इतका पगार नाही ,तरी ते कधी आपले दुखडी बाजू मांडत नाहीत . आपल्याला कोणती पण मदत  पोलीस करतात. पोलीस हा प्रत्येक  कर्तव्यासाठी समर्पण करत असतो. मग आपण पण त्यांना सहाय्य देऊन त्यांच्या कामात मदत केली पाहिजे. जनतेने  प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्यापुढे समर्पण करावे. 

  

                                धनश्री सुगावकर- वागरे

                                         नांदेड - मुंबई

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...