Skip to main content

सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयात बोली भाषेचा जागर




किनवट प्रतिनिधी:

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी  सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट येथे घेण्यात आला. मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध व संपन्न भाषा आहे मराठीच्या विविध बोली या मराठी भाषेचे वैभव आहेत बोलीभाषा ही महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलली जाणारी मराठी भाषेची प्रादेशिक अभिव्यक्ती आहे मराठी भाषेच्या या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने  मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार व भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनानुसार  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलींचा जागर करताना अतिशय दुर्मिळ अशा कोलामी बोली या भाषेवर विचार मंथन करण्यात आले. शोभायात्रा आदिवासी लोककलांचे सादरीकरण, संवाद व बोलींचे वैशिष्ट्य यासोबतच बोलीभाषा अभ्यासक व तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात झाले.



    कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार यांच्या हस्ते झाले भाषा अभ्यासक  प्राचार्य डॉ. आनंद भंडारे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख व भाषा संचालनालयाचे सल्लागार  व भाषेचे अभ्यासक प्रोफेसर डॉ पृथ्वीराज  तौर, कोलामी बोलीचे अभ्यासक प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय नांदेड चे प्राचार्य डॉ. राजू मोतेराव यांनी बोलीचे वैशिष्ट्य व काळानुसार लोकपाबत चालत असलेल्या बोलीं यांची कारण  मीमांसा,, समस्या व उपाययोजना  याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य भंडारे यांनी अध्यक्षीय समारोप करताना  युवा पिढीची आणि समाजाची बोली संवर्धनासाठी आवश्यक असलेली भूमिका विशद करत आपल्या परिसरातल्या बोली संवर्धनाच्या कामासाठी युवकांनी अभ्यासकांनी पुढे यावे असे आवाहन केले.  संस्थेचे सचिव मुख्याध्यापक कृष्णकुमार नेमानीवार महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाचे भारत जाधव सुधाकर महाजन व राहुल सूर्यवंशी, सरस्वती कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. किरण पाईकराव, संत भगवान बाबा कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव   उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुपरवायझर  प्रा रेणुकादास पहूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती 

   यावेळी किनवट परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा आदिवासी गिरीजन पुरस्कार विजेते मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम, लक्ष्मी टिळक उत्कृष्ट वांग्मय पुरस्कार विजेते डॉ. वसंत राठोड 2025 चा कृष्ण वाद्य निर्मिती पुरस्कार विजेते भालेराव दडांजे यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शक्ती नगर घुगरवाडी येथील कोलाम महिला व पुरुषांच्या संचाने विविध प्रकारची गीत प्रस्तुत केली. पाटा गायक मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम राजेश्वर मेश्राम यांनी किंगरी वाद्यावर पाटा गायन केले. माध्यमिक शाळेतील शिक्षक करण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींचे लेझीम पथक, वारकरी संप्रदायाचे देवबाजी केंद्रे व सौ प्रमिलाबाई केंद्रे यांच्या टाळ विना यांच्यासह  वारकरी भजन व परमेश्वर मेश्राम आणि राजेश्वर मेश्राम यांच्या आदिवासी पेपर वादनासह संकुल परिसरात शोभायात्रा काढण्यात आली यात महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व सरस्वती शिक्षण संस्थेतील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यात सहभागी झाले. दीप प्रज्वलन महाराष्ट्र राज्य गीत व विशाखा होळंबे आणि खुशी चव्हाण यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मराठी विभाग प्रमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले भाषा विभागाचे भारत जाधव यांनी शासनाची या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. डॉ सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले किरण आईने वार यांनी आभार व्यक्त केले  या कार्यक्रमात किनवट व माहूर परिसरातील विविध बोलींचे संकलन व संवर्धन करण्यासाठी सरस्वती महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या बोली संवर्धन प्रकल्पाची माहिती माहिती उपस्थित त्यांना देण्यात आली, राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...