Skip to main content

किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरीत सुरू करा व दुभाजक बसवा- मराठी पत्रकार परिषदेची मागणी

 


किनवट : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161/A मागील पाच ते सहा वर्षांपासून रेंगाळत पडलेल्याने व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व धुळीमुळे नागरिकांना अतोनात होत असलेल्या त्रासाबाबत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनावेळी शारदा कंट्रक्शनच्या वतीने पाच दिवसात आम्ही रस्ता दुरुस्त करणार असे लेखी आश्वासन देण्यात आले.

दोन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतूक पूर्ण पणे विस्कळीत झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा ही लागल्या होत्या. काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन नंतर पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली.

मागील पाच ते सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अशोक स्तंभ व स्व. बाळासाहेब ठाकरे चौक ते गोकुंदा येथील पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे व धुळीचे साम्राज्य होऊन अपघात ही झाले तसेच रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बसवण्यात आले नाही  याप्रकरणी वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नसल्याने मराठी पत्रकार संघाच्या वतीने रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्या रास्तारोकोला सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून रास्तारोको यशस्वी केले. रास्तारोको आंदोलनावेळी शासनाने नियुक्त केलेल्या शारदा कंट्रक्शनचे शेख जावेद व रोशन चव्हाण यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार त्वरित कामाला सुरुवात करून पाच दिवसात आम्ही रोडची दुरुस्ती करू असे लेखी पत्र मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष्यांकडे सोपविल्याने दोन तास सुरू असलेले रास्तारोको आंदोलन पाच दिवसासाठी मागे घेण्यात आले पाच दिवसानंतर रोडची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.


यावेळी वैजनाथ करपुडे पाटील व्यंकट भंडारवार माजी नगराध्यक्ष के.मूर्ती पत्रकार मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दगडू भरकड परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष फुलाची गरज पाटील जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर तालुकाध्यक्ष प्रमोद पोहरकर सचिव बालाजी सिरसाट कार्याध्यक्ष किरण ठाकरे ,बबन वानखेडे ,विलास सूर्यवंशी ,दिलीप पाटील ,गौतम येरेकर, दुर्गादास राठोड ,विनोद भरणे ,शरद जैस्वाल अमरदीप कदम प्रशांत कोरडे प्रशांत सातुरवार ,संदीप कराळे, सुनील चव्हाण, विश्वास कोल्हारीकर, शैलेश गटलेवार,,मिलिंद धावारे ,नागनाथ भालेराव यांच्यासह रास्तारोको आंदोलनात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...