Skip to main content

'काहूर' काव्यसंग्रहास राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त.

 


किनवट: अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील 'राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार  किनवट जि.नांदेड येथील साहित्यिक कवी.रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहास दिनांक ८ जुन २०२४ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे (प.) येथे प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार मराठी साहित्य मंडळ आयोजित २०वे राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटक मा.संजय केळकर साहेब, (आमदार ठाणे शहर विधानसभा) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी,(महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उस्मानाबाद), स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, प्रमुख अतिथी प्रतिभाताई राजेश मढवी(माजी नगरसेविका,नौपाडा विभाग) या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल,सन्मानचिन्ह व मानदपत्र असे होते.या प्रसंगी राज्यस्तरीय काव्यसंमेलनात राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक कवी यांनी हजेरी लावली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या प्रेरणेतून, आयोजक प्रणिता देवरे (ठाणे जिल्हाउपाध्यक्षा) आणि डॉ. राजेंद्र कवडे ( ठाणे  जिल्हाउपाध्यक्ष )यांनी यशस्वी केला. 

कवी रामस्वरूप मडावी यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल किनवट येथील साहित्य क्षेत्रातील मंडळी सर्वश्री डॉ. उत्तम कानिन्दे, रमेश मुनेश्वर, मोहन जाधव(मुख्याध्यापक), रुपेश मुनेश्वर, सुर्यभान खंदारे, किशन धुर्वे,देविदास वंजारे,प्रदीप कुडमेथे,सुरेश पाटील, राजेश पाटील, व मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...