Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

किनवटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजुर

किनवट ता. प्र.:- किनवट किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उभारणीसाठी मंजुरी मिळाली असून तसे पत्र २२ एप्रिल रोजी नांदेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुरेखा कोसमकर यांनी पाठविले आहे. नांदेड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आणि शेजारच्या तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालय निर्माण करावे, अशी येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. न्यायालयीन कामकाजासाठी नांदेड येथे येत असताना नागरिकांचा वेळ तसेच पैशाचा अपव्यय होत होता. किनवट हा आदिवासी तसेच डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय नाही. त्यामुळे येथे जिल्हा सत्र न्यायालय  मंजूर करावे, अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. दरम्यान, २२ एप्रिल रोजी नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने किनवट येथील बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठविले असून त्यात किनवट येथे जिल्हा आणि अतिरिक्त सन्त्र न्यायालय उभारणीसाठी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. किनवट आणि माहूर तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करण

किनवट येथे कडक उन्हाच्या पाऱ्यामध्येही मतदारांनी आपला हक्क बजावला

 किनवट येथील नगर परिषद मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी एक महिला वॉकर घेऊन चालतांनाच क्षणचित्रे  किनवट:- हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या किनवट येथील नगर परिषद मतदान केंद्रावर भर उन्हात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  सकाळ पासूनच विविध ठिकाणी नियोजित केंद्रावर मतदानास सुरवात झाली  सकाळ ७ वाजल्या पासून हळुहळु मतदार येण्यास सुरूवात झाली सकाळी वयोवृद्ध महिला, तर दोन अपंग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर नव मतदारानी देखील आपले पहिले मत नोंदवले त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मतदान करतांना आनंद ओसंडून वाहत होता. नंतर १० वाजता संख्या वाढली नंतर मंदावली त्या नंतर थेट सायंकाळी मतदार उन्हाच्या तापमानामुळे  ४:४५ सुमारास संख्या वाढली व किनवटचे मतदान ६८.७७ टक्के झाले मतदान केल्या नंतर सेल्फी काढून आनंद व्यक्त करणारे नेम्मा निवार पारिवार  मतदान केल्या नंतर बोटावरची शाही दाखव तानांचे भातनासे परिवार

ग्रामपंचायत घोटी जवळील नावाखेडा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता परंतु स्वस्त अन्नधान्य दुकानदारावरील कारवाई करण्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावाली यांच्या लेखी आश्वासनाने बहिष्कार मागे घेण्यात आला

 ग्रामपंचायत घोटी अंतर्गत नवाखेडा येथील स्वस्त धान्य दुकाना वरील कारवाई करण्यास प्रशासनाने तयारी दर्शवल्यामुळे मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात आला किनवट ता. प्र. ग्रामपंचायत घोटी जवळील नावाखेडा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता परंतु स्वस्त अन्नधान्य दुकानदारावरील कारवाई करण्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने  बहिष्कार मागे घेण्यात आला . सकाळ पासुनच नावाखेडा येथील  स्वस्त धान्य दुकानदार यांच्या काळा बाजारी विरोधात ग्रामस्थांनी बहिष्काराचे हत्यार उपसले व मतदान न करण्याचा निर्णय घेतला परंतु सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने ग्रामस्थानी मतदान करण्याचा निर्णय घेतला व  तेथील परिसरातील मतदान सुरळीत पार पडले.

खरबी येथे १०० वर्षाच्या भाग्यरथा आजी बाईंनी बजावला मतदानाचा हक्क

  उमरखेड:- खरबी येथील गं.भा भाग्यरथाबाई नारायण पांडे वय वर्ष १००  आणि त्यांची मुलगी गं.भा अंजनाबाई खूपसे वय वर्ष ८० यांनी आज मतदान करून आपला हक्क बजावला सकाळ पासुन दुपार पर्यंत उन्हाच्या पाऱ्यांने नागरीकांनी घरा बाहेर कमी प्रमाणात पडत मतदान झाले परंतु दुपार नंतर ५ वाजेच्या सुमारास गर्दी वाढली 

तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोनं करा -प्रा. विठ्ठल कांगणे

  तालुका प्रतिनिधी घोटी/किनवट:- तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोने करा तुम्हाला शिक्षण  मिळत  आहे त्यांचा फायदा घ्या आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असे प्रतिपादन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त घेण्यात आलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आनंदरावजी वाढे (सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी नांदेड ) होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक अभियंता प्रशांत ठमके (भारतीय बौद्ध महासभा किनवट) हे होते  स्वागताध्यक्ष अशोक कोसले यांनी सर्वांचे स्वागत केले   प्रमुख अतिथी म्हणून ॲड. प्रकाशजी गेडाम  (अध्यक्ष आढावा समिती आदिवासी प्रकल्प किनवट ), सुकुमार पेटकुले (अखिल भारतीय माळी महासंघ तेलंगणा ) हे मंचावर होते  प्रमुख पाहुणे म्हणून सुनील बेहरे, प्राचार्या शुभांगीताई ठमके, सौ.निर्मलाबाई मेश्राम (सरपंच) राजू सुरोशे (उपसरपंच), ॲड सुनिल येरेकार, विकास कुडमेते, दत्ता कसबे ,जीवन कोटरंगे , प्रा. दगडू भरकड,अरविंद आत्राम ,लक्ष्मण भवरे ,बालाजी आत्राम, संदीप पेटकुले, अनुसया गरड, दीपिका येरमे, सुलोचना भवरे, बेबी मेश्राम ,शकुंतला

भाजपनी जाती जातीत विष पेरण्याच काम केल - सुषमा अंधारे यांचा घनाघात

  किनवट प्रतिनिधी:- दि.१९ भाजपने जाती जातीत वीष पेरण्याच काम केलं असा घनाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदान किनवट येथील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार सभेत त्यांनी आपले मत मांडले हिंगोली लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांची जाहीर सभा घेण्यात आली होती मंचावर आदिवासी नेते शिवाजीराव मोघे माजी आमदार खाजा बेग आर्णि,माजी आमदार प्रदीप नाईक बबनराव थोरात,वसीम देशमुख , ज्योतिबा दादा खराटे , सूर्यकांत रेड्डी कल्यामवार ,के .मूर्ती , गिरीश नेम्मनिवार ,राहुल नाईक , सचिन कदम( संभाजी ब्रिगेड), प्रवीण राठोड , प्रा. शिल्लेवार , बाबुराव जाटवे , काँग्रेस  , राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार ) ,(उद्धव बाळासाहेब ठाकरे )शिवसेना आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी गटनेते तालुकाध्यक्ष संपर्कप्रमुख विविध भागातील कार्यकर्ते लाखोच्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या या भाजपवाल्याने इतकी महागाई वाढवली की सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे हे सरकार फक्त जाहिरातबाजी आणि खोटे बोलण्यात पटाईत आहेत आमची मुलं मुली किती

किनवट येथे महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन, आरोग्य तपसणी करण्यात आली

  किनवट बातमीदार:- राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची १९७ वी जयंती महात्मा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात आली या वेळी थायरो केयर लॅब तर्फे मोफत रक्त तपासणी करण्यात आली होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक, पिरीपी जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, भाजप नेते अशोक सुर्यवंशी, ॲड प्रतिक केराम, आनंद मच्छेवार, संदीप पेटकुले, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, उत्सव समिती अध्यक्ष गौताम पाटील, अनिल महामुने, ॲड मिलींद सर्पे, गोकुळ भवरे, स्वप्निल भालेराव, राजेश पाटील, राज माहुरकर, प्रशिक मुनेश्वर, निखिल कावळे, संघर्ष घुले, संतोष सिसले, माधव कावळे, गंगुबाई परेकार,  सुमेध कापसे, सचिन कनाके, तुळशीराम वाडगुरे, संतोष पेटकुले, सुनिल खामकर, राजु बविस्कर, वैभव ढोले, वेदांत वाढई, स्वप्नील वाढई, उमेश प्रधान, अनिल उमरे, प्रफुल आढागळे, ॲड सम्राट सर्पे, बालकीशन कांबळे, मधुकर पाटील, योगेश भवरे, प्रशांत ठमके, ब्रम्हा एडके, राजु पाटील (घोटीकर), सुमेध रावळे, थायरो केयर लॅबचे दिलीप र

एकीकडे दुःख, दुसरीकडे दिलासा, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, पण पत्नीला लॉटरी, सूत्रांची माहिती

महाराष्ट्र:-  शि वसेनेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत आणि आज दिवसभर प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं. हे बैठकांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली. पण हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी विरोध दर्शवल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली. त्यामुळे ते सुद्ध चिंतेत होते. अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे. शिवसेना पक्षाने हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. असं असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांना थोडासा दिलासादेखील दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली अ