Skip to main content

तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोनं करा -प्रा. विठ्ठल कांगणे

 


तालुका प्रतिनिधी घोटी/किनवट:-

तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोने करा तुम्हाला शिक्षण  मिळत  आहे त्यांचा फायदा घ्या आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असे प्रतिपादन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त घेण्यात आलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आनंदरावजी वाढे (सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी नांदेड ) होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक अभियंता प्रशांत ठमके (भारतीय बौद्ध महासभा किनवट) हे होते  स्वागताध्यक्ष अशोक कोसले यांनी सर्वांचे स्वागत केले 

 प्रमुख अतिथी म्हणून ॲड. प्रकाशजी गेडाम  (अध्यक्ष आढावा समिती आदिवासी प्रकल्प किनवट ),

सुकुमार पेटकुले (अखिल भारतीय माळी महासंघ तेलंगणा ) हे मंचावर होते  प्रमुख पाहुणे म्हणून सुनील बेहरे, प्राचार्या शुभांगीताई ठमके, सौ.निर्मलाबाई मेश्राम (सरपंच) राजू सुरोशे (उपसरपंच), ॲड सुनिल येरेकार, विकास कुडमेते, दत्ता कसबे ,जीवन कोटरंगे , प्रा. दगडू भरकड,अरविंद आत्राम ,लक्ष्मण भवरे ,बालाजी आत्राम, संदीप पेटकुले, अनुसया गरड, दीपिका येरमे, सुलोचना भवरे, बेबी मेश्राम ,शकुंतला राठोड ,बालाजी पावडे ,तुळशीराम गुरूनुले ,भारत सोनुले ,शशिकांत लढे , नूर सेठ आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक कांगणे सर म्हणाले की प्रत्येकाला संविधानाने मूलभूत अधिकार कर्तव्य दिली आहे त्यामुळेच आपला भारत एक संघ  सशक्त  बनला आहे म्हणून संविधानाचे वाचन करा व संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करा तसेच नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्यांचं स्टेटस बघत बसण्यापेक्षा स्वतःच स्टेटस बनवा जेणेकरून लोक तुमचा स्टेटस ठेवतील यानंतर त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व त्यांचे मौलिक समाजकार्य सांगितले या कार्यक्रमास असंख्य युवक युवती विद्यार्थी पालक वर्ग , पत्रकार बांधव, गावकरी उपस्थित होते  कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय माळी महासंघ शाखा घोटी तालुका किनवट यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार वाढे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते