Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात दमदार कामगिरी

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात पंडितजींची उत्कृष्ट भूमिका साकारली असून दमदार कामगिरीला सुरुवात झाल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व पत्रकारांनी लहुकुमार शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मानवी मन अतिशय संवेदनशील आहे अशा संवेदनशील मनाला प्रेमाची किनार लाभली तर जीवन सुंदर बनते आणि जीवन जगण्याची उत्कंठा वाढते. प्रेम ही भावनाच हृदयापासून उत्पन्न होते व हृदयापर्यंत पोहोचते मग ते आईचे प्रेम असो, भावाचे प्रेम असो, किंवा प्रेयसीचे प्रेम असो. जे चिरकाळ टिकते तेच प्रेम असते. अशा आशयाचा "तू ही मेरी जान" (love story) हा हिंदी चित्रपट (short movi) लहान थोर व प्रौढ व वृद्धांनी पहावा असाच आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक के मनोज असून निर्माता संजय प्रजापती आहेत. सहदिग्दर्शक रवी कुमार तर संगीत अजय राजा यांनी दिले आहे. मेन हिरोच्या भूमिकेत संजय कुमार असून पंडितजीच्या भूमिकेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष व सुवर्णयुगचे मुख्य संपादक लहूकुमार आहेत. मेन व्हीलन (राख

करंजी येथे विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी.

  उमरखेड:  तालुक्यातील करंजी  येथे दि.21 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध  महासभा  शाखा  करंजी व जयंती  उत्सव समिती  करंजीच्या वतीने  नुकतेच  विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. पंचशील  ध्वजारोहन  सकाळी मा. माधवराव कलाने  पाटील करंजी सोसायटीचे  अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे  उदघाटन मा. राहुल कऱ्हाळे (प्रकल्प अधिकारी बार्टी यवतमाळ )यांचे हस्ते केले. कार्यक्रमाचे  अध्यक्ष मा. विजयराव  खडसे ( माजी आमदार उमरखेड )तर कविसंमेलनाचे  अध्यक्ष मा. सुधाकर लोमटे (सुप्रसिद्ध साहित्यिक उमरखेड )यांनी पद भूषविले. प्रमुख पाहूणे =मा. प्राचार्य मोहनराव मोरे (माजी नगराध्यक्ष  पूर्णा.),मा. किशोर  भवरे  दलितमित्र (महापौर  प्रतिनिधी  नांदेड ), धम्मदीप  काळबांडे(अध्यक्ष भा. बौद्ध महा उमरखेड तालुका )उत्तम कानिंदे (स्तंभलेखक  किनवट ),प्रा. मुनेश्वर मॅडम,रंजना वाघमारे सामाजिक कार्यकर्त्या  बिटरगांव,शुद्धोधन घुगरे  (सरपंच  करंजी ) निवृत्ती काळबांडे, अनिल कांबळे ( सावळेश्वर,पोलीस पाटील )संगीताताई कलाने  (पोलीस पाटील करंजी ) अभय  कांबळे बिटरगाव,युवर

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड किनवट दौऱ्यावर

     किनवट ता.प्रतिनिधी:   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड   अध्यक्षतेखाली व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या उपस्थितीत किनवट तालुका कार्यकारणी ची महत्त्वपुर्ण  बैठक संपन्न झाली.    आज दिनांक 24 एप्रिल रोजी ठीक 2 वाजता "आज कि न्यूज" कार्यालयात आयोजित बैठकीत किनवट तालुका कार्यकारणीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली.     पत्रकारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा यशस्वीपणे प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेच्या मार्फत होत असून आपल्या काही समस्या असतील तर त्या जिल्हा कार्यकारणी कडे किंवा संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सर यांच्याकडे मांडाव्यात त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असेही आश्वासन जिल्हाध्यक्ष मा.संजीव कुमार गायकवाड यांनी या बैठकीदरम्यान बोलताना दिले.    तसेच किनवट टीमच्या  वतीने विविध विधायक कार्यक्रम राबवून समाजसेवा कार्यात अग्रेसर असल्याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त करून

पोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  देगलूर, नांदेड : पोलीस विभागातील सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने आपले कर्तव्य बजावित असतात. दिवाळी आली पोलीस, होळी आली पोलीस, ईद आली पोलीस, राजकीय नेते आले पोलीस, हत्या झाली पोलीस, भांडण झाले पोलीस, अपघात झाला पोलीस, मतदान प्रक्रिया पोलीस, चोरी झाली पोलीस, मारामारी झाली पोलीस अशा विविध ठिकाणी पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते. काहीवेळा स्वतःच्या कुटुंबांसाठीही वेळ देता येत नाही. म्हणून पोलिसांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनूरे, तालुका संघटक मारोती देगावकर, मनोज बिरादार, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार, तालुका सचिव संतोष मनधरणे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर देशमुख, देगलूर शहर अध्यक्ष उमाकांत कोकणे, अनिल पवार, दादाराव वेळीकर, मल्लिकार्जुन कडलवार, अमित पाटील आदी पदाधिकारी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.  यावेळी माढा तालुका, करमाळा तालुका, माळशिरस तालुका कार्यकारिणी व सोलापूर जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या. सदर कार्यक्रम टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमाच्या हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रेस संपादक व पत्रकार  सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीमती विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव श्रीमती प्रमिला जाधव, तसेच माळशिरस तालुकाध्यक्षपदी शशिकांत कडबाने, उपाध्यक्षपदी किरण शेंडगे, माढा तालुका अध्यक्षपदी कुंदन वजाळे, तालुका उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका अध्यक्षपदी अगंद भांडवलकर, उपाध्यक्षपदी धनंजय पाटील, तालुका सचिवपदी अक्षय वरकड, तालुका सचिव हर्षवर्धन गाडे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करून पुणे जिल्हाध

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा.जय कराडे यांना २०२२ सालचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

कोल्हापूर :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा.जय कराडे यांना लोकशासन न्यूज नेटवर्क कडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्रा.कराडे यांचा सत्कार करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कास पठार याठिकाणी लोकशासन न्यूज चा दुसरा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला.यावेळी न्युज 1 इंडिया चॅनेल चे निवासी संपादक आनंद गायकवाड व प्राईम्स एफ एक्स कंपनी च्या सर्वेसर्वा रूपाली चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आनंद गायकवाड यांनी सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, पुणे, रायगड, लातुर, अमरावती, वाशिम, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यातील पत्रकार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. प्रा.कराडे, रुपाली चव्हाण, धम्मशील सावंत, राजेंद्र वाटाणे, विनोद ढेरे, किशोर सोनकांबळे व अजय कल्याणे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी 'ABP माझा' चे पत्रकार रविंद्र कोकाटे यांची निवड

  रत्नागिरी:-   रविंद्र कोकाटे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   श्री रविंद्र कोकाटे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक

संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

  माणगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांना पत्रकारिता क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी नुकताच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुडीपाडवा या मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला AS मराठी न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त सदर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, AS मराठी न्यूजचे मुख्य संपादक अनंत खराडे, व्यवस्थापकीय संपादक सागर पवार, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे, साईचे सरपंच हुसेन रहाटविलकर, नाभिक समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला सत्वे, AS मराठी न्यूजचे पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारिता करीत असतांना पत्रकारांनी काय काळजी घ्यावी? पत्रकारितेचे नियम व आचारसंहिता याबद्दल मार्गदर्शन केले. संघटनेचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी पत्रकारित

किनवट तालुक्यातील बेंदी ,बोधडी, येंदा -पेंदा भुलजा परीसरात उल्कापात सदृष्य दृश्य

 किनवट तालुक्यातील बेंदी ,बोधडी, येंदा -पेंदा भुलजा परीसरात उल्कापात सदृष्य   तालुका प्रतिनिधी किनवट:- किनवट तालुक्यातील बेंदी, भुलजा,येंदा- पेंदा या ग्रामीण भागात उल्कापात झाल्याचे आढळुन आले या मुळे गावकऱ्यात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते पण प्रसार माध्यमातुन खगोल तज्ञ श्रीनीवास औंधकर नांदेड एम जी एम कॉलेज नांदेड माहिती दिली कि ते  रॉकेट बुस्टरचे तुकडे आहेत  न्युझीलंड येथील एका यानाचे ते पार्ट आहे असा दावा त्यांनी केला आहे या  मुळे घाबरण्याचे कारण नाही असे सांगण्यात आले तसेच अशाच उत्का पाताचे दृष्य विदर्भातही पहावयास मिळाले याचा आनंद विज्ञान प्रेमी लोकांनी घेतला .