Skip to main content

Posts

Showing posts from June, 2024

सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !

 सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !  किनवट प्रतिनिधी  मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोकुंदा व्दारा संचलित मातोश्री कमलताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य सामाजिक न्याय दिन व शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्याच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या 10 वी व 12 वी परीक्षेतील गुणवंताचा व वैद्यकीय प्रवेशास पात्र विद्यार्थी तसेच त्यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ गोकुंदा रोड स्थित एन.के.गार्डन येथे संपन्न झाला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भिमराव केराम, आमदार किनवट माहूर व प्रमुख पाहुणे मा.कावलि मेघना मॅडम-सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, मा.सुनिल बिर्ला,पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन,किनवट, मा.राजेंद्र शेळके सहाय्यक प्रकल्प अधिकारी,मा.प्रेमसिंग आडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, मा.प्रदीप

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे : संजीव वानखेडे

  किनवट : शासनाच्या विविध व जनकल्याणकारी योजना राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी आज दारिद्रय नारायणाचा अवतार म्हणून जगत आहेत. ग्रामपंचायत कामगार आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढत असून, किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांनी 1 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरुन निघणार्‍या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे यांनी केले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरून विधानसभेवर मोर्चा धडक देणार आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन लागू करणे, कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटना (ई.पी. एफ.) या कार्यालयात जमा करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वर्ग 3 व 4 च्या पदावर नियुक्ती द्यावी, यासह विविध मागण्या रेटून धरल्या जाणार आहे. सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस दयानंद एरंडे व कार्याध्यक्ष जनार्दन मुळे यांनी या आंदोलनाची हाक

किनवट येथे आतंरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

  किनवट : योग दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे, ही आपल्या देशासाठी अभीमानाची बाब आहे. कारण, योगा हा आपल्या भारताच्या सांस्कृतीक वारसाचा अविभाज्य भाग आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.  दि. 21 जून, 2024 हा दिवस 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आयोजित करण्याच्या केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार येथील तालुका क्रीडा संकुलात तालुका प्रशासनाच्या वतीने " आंतरराष्ट्रीय योग दिन " साजरा करण्यात आला.      याप्रसंगी किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार मुगाजी काकडे,केंद्र प्रमुख रमेश राठोड, मुख्याध्यापक ना.ना. पांचाळ,क्रीडा प्रशिक्षक संदीप यशीमोड, डॉ. अशोक चिन्नावार, बाळकृष्ण कदम, अजय कदम, राजेश पाटील, संजय धोबे, रामराव राठोड, डॉ आमोल पवार ,राजु मेलडे, मारोती येशीमोड,अतिष तामगाडगे, रोमा गादेकर, संप्रका कानिंदे, बेबीराणी श्रीनिवास माहूरकर आदिं प्रमुखांसह शासकीय व्यायाम शाळेतील युवक तथा कराटे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक भदाने यांनी यो

'काहूर' काव्यसंग्रहास राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त.

  किनवट: अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील 'राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार  किनवट जि.नांदेड येथील साहित्यिक कवी.रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहास दिनांक ८ जुन २०२४ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे (प.) येथे प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार मराठी साहित्य मंडळ आयोजित २०वे राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटक मा.संजय केळकर साहेब, (आमदार ठाणे शहर विधानसभा) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी,(महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उस्मानाबाद), स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, प्रमुख अतिथी प्रतिभाताई राजेश मढवी(माजी नगरसेविका,नौपाडा विभाग) या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल,सन्मानचिन्ह व मानदपत्र असे होते.या प्रसंगी राज्यस्तरीय काव्यसंमेलनात राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक कवी यांनी हजेरी लावली. संस्थेचे राष्ट्

प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घ्या : किनवट तालुका ग्राहक पंचायतीची मागणी

  किनवट, ता.८(बातमीदार ) : राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे व सचिव सुरेश शेंडे  यांनी केली आहे.स्मार्ट मीटरमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.     राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असून हा निर्णय रद्द करण्यात यावा. जनता आधीच महागाईचा चटका सोसत आहे. शहरातील अनेक कुटुंबे अस्थायी कामे करतात.हजारो लोकांचे मासिक उत्पन्न १० हजार ते १५ हजारांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कार्यालयांमध्ये बिले भरण्याची जबाबदारी त्या विभागाची असते. त्यामुळे त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण सामान्य माणसाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, असेही ग्राहक पंचायतीचे म्हणने आहे.     नफा मिळवणाऱ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी विजेला सुपर नफा कमावणाऱ्या कमोडिटीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आल

किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरीत सुरू करा व दुभाजक बसवा- मराठी पत्रकार परिषदेची मागणी

  किनवट : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161/A मागील पाच ते सहा वर्षांपासून रेंगाळत पडलेल्याने व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व धुळीमुळे नागरिकांना अतोनात होत असलेल्या त्रासाबाबत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनावेळी शारदा कंट्रक्शनच्या वतीने पाच दिवसात आम्ही रस्ता दुरुस्त करणार असे लेखी आश्वासन देण्यात आले. दोन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतूक पूर्ण पणे विस्कळीत झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा ही लागल्या होत्या. काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन नंतर पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली. मागील पाच ते सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अशोक स्तंभ व स्व. बाळासाहेब ठाकरे चौक ते गोकुंदा येथील पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे व धुळीचे साम्राज्य होऊन अपघात ही झाले तसेच रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बसवण्यात आले नाही  याप्रकरणी वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नसल्याने मराठी पत्रकार संघाच्या वतीने रास्तारोको आंदोलनाची हाक देण्

ॲड. चंद्रशेखर आझाद लोकसभेवर निवडून आल्या बद्दल किनवट मध्ये जल्लोष

  ता. प्र. किनवट : उत्तर प्रदेशातील नगिना मतदारसंघातून आझाद समाज पार्टीचे व भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बहूजन नेते, अ‍ॅड. चंद्रशेखर भाई आझाद यांना नगिना मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून देवून लोकसभेत पाठविल्याने किनवट येथे जल्लोष साजरा करण्यात आला. भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी ता.4 जून रोजी सायं.7.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले व विजयाचा जल्लोष साजरा केला. अ‍ॅड. चंद्रशेखर भाई आझाद हे 5,12,552 अशा प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे ओम कुमार यांचा पराभव केला ओम कुमार यांना 3,61,079 इतकी मते मिळाली. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांचे पक्ष व संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.    या विजयी जल्लोषात सामाजिक कार्यकर्ते अभय नगराळे, अ‍ॅड.सम्राट सर्पे, सुगत नगराळे, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे, किरण कहाते, आदित्य कयापाक, प्रतिक लढे, राहुल करमकार, मंगेश कुंभारे, सुबोध कांबळे, सुमित शेंद्रे, क्षितीज मुनेश्‍वर, योगेश भवरे, निवेदक क

नांदेडची सायंटिस्ट भीमकन्या मनाली दामोधर हिच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक

  स्त्री गर्भाशयाच्या पीसीओएस आजाराच्या निदानासाठी शोधली पहिली कीट......... नांदेड - येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या कु. मनाली गौतम दामोधर हिने आपल्या बुध्दी कौशल्याच्या जोरावर संशोधन क्षेत्रात अदभुत आणि असामान्य कामगिरी केली आहे. इयत्ता बारावी नंतर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स ,मास्टर ऑफ सायन्स हा पाच वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना मनाली दामोधर हिने महिलांच्या गर्भाशयाच्या पीसीओएस या गंभीर आजाराचे अगदी सहज सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने यशस्वी केलेल्या प्रयोगाने चक्क जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला असून त्याबद्दल त्यांच्या टीमने सुवर्णपदक पटकावले आहे.  त्यामुळे नांदेडच्या या सायंटिस्ट भीम कन्येने संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा भीम पराक्रम केला आहे, त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.  सध्या तरोडा सांची नगर येथील रहिवाशी मनाली गौतम दामोधर ही  हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण या गावाची मूळ रहिवासी असून  वडीलांच्या नौकरी निमित्ताने कुटूंब