Skip to main content

सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !




 सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न ! 

किनवट प्रतिनिधी 

मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोकुंदा व्दारा संचलित मातोश्री कमलताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य सामाजिक न्याय दिन व शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्याच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या 10 वी व 12 वी परीक्षेतील गुणवंताचा व वैद्यकीय प्रवेशास पात्र विद्यार्थी तसेच त्यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ गोकुंदा रोड स्थित एन.के.गार्डन येथे संपन्न झाला.


यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भिमराव केराम, आमदार किनवट माहूर व प्रमुख पाहुणे मा.कावलि मेघना मॅडम-सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट,

मा.सुनिल बिर्ला,पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन,किनवट, मा.राजेंद्र शेळके सहाय्यक प्रकल्प अधिकारी,मा.प्रेमसिंग आडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, मा.प्रदीप नाईक सहाय्यक प्रकल्प अधिकारी,मा.दत्तात्रय डोंगशेनवार, मा.शुभांगीताई ठमके, प्राचार्या म.ज्यो.फुले मा.व.उ.मा.वि.घोटी ता.किनवट,संस्थेचे सचिव मा.अभि प्रशांत ठमके,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गणु जाधव केंद्र प्रमुख,नया कॅंप  मा.संतोष मरसकोल्हे  ॲड.मिलिंद सर्पे,गोकुळ भवरे,किरण ठाकरे,दत्ता जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रारंभी मान्यवरच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमाचे दीप-धूप-पूष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर संस्थेचे सचिव मा.अभि प्रशांत ठमके व कोष्याध्यक्षा मा. शुभांगीताई ठमके यांनी मान्यवराचे शाल- पूष्पहार देवून स्वागत केले. कार्याक्रमाचे  प्रास्ताविकात प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री.अंबादास जुनगरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जात आहे याचे सविस्तर विवरण केले.


या सत्कार समारंभात संस्थेच्या सलंग्न असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडीयम स्कुल कोठारी, महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोटी, मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय सुभाषनगर, किनवट, मातोश्री कमलताई ठमके उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा या मधील 10 वी 12 वी परीक्षेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे गुणवंत, वैद्यकिय प्रवेशास पात्र गुणवंत व  पाल्यांचा सत्कार शाल, पुष्पहार व ग्रंथभेट देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा सेमी इंग्रजी माध्यमात एकूण 241 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी शंभर टक्के आहे. त्यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे तब्बल 73 विद्यार्थी आहे व 75 % पेक्षा जास्त गुण घेणारे 133 विद्यार्थी आहे. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण प्राप्त केलेली आहे व एका विद्यार्थिनीने सामाजिक शास्त्रामध्ये शंभर गुण घेतलेले आहेत.


मराठी माध्यमात 165 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 163 उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 98.78 आहे.90% पेक्षा जास्त गुण घेणारे 7 विद्यार्थी आहेत. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला परीक्षा, विज्ञान प्रदर्शनी व खेळ यामध्ये  विद्यार्थी सहभागी होत असतात यामध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच NMMS परीक्षेत तीन विद्यार्थी पात्र ठरले आहे व पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दहा व आठ विद्यार्थी अनुक्रमे गुणवंत ठरले आहेत.


चित्रकला परीक्षेत इंटरमीडिएट मध्ये 130 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्याची टक्केवारी 96.15 आहे एलिमेंटरी या परीक्षेमध्ये 334 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले टक्केवारी 89.22 आहे.


उच्च माध्यमिक विभागात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 422 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 99.05 आहे. कला विभागात 199 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेचा निकाल 88.44 आहे प्राणी विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र व गणित विषयात शंभर पैकी 100 गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत. तसेच वैद्यकीय प्रवेशास अनेक विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. आनंद राम नरवाडे हा विद्यार्थी आयआयटी गुवाहाटी येथे प्रवेशासाठी पात्र झाला आहे.


आज प्रदूषणाचे भूत सगळ्यांच्याच मानगुटीवर बसलेला आहेत त्यालाच पर्याय म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी रामानंद अनिल शिरभाते याने एटनॉमस मोबाईल चार्जिग स्टेशन फॉर इलेक्ट्रिकल वेहिकल्स या प्रकल्पाचे राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सादरीकरण केले, संस्थेअंतर्गत चालविल्या जाणान्या मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स गोकुंदा या इन्स्टिट्यूट मधून नीट परीक्षेत अगदी कमी कालावधीत विद्याथ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. संस्थेच्या इतर विद्यालयाने सुद्धा मार्च 2024 च्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेले आहेत.


मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल गोकुंदा यामध्ये दहावीला 55 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 54 विद्याधर्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 98.43 अशी आहे.

मातोश्री कमलताई उमके उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीला एकूण 180 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 179 उत्तीर्ण झाले. त्यामधील नामांकित शाळेत असलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले नामांकित शाळेत चा निकाल शंभर टक्के आहे याच कॉलेजचा विद्यार्थी सुयश प्रशांत ठमके हा 92.67% गुण घेऊन केवळ कॉलेजमधूनच नाही तर माहूर आणि किनवट या दोन्ही तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.तसेच उद्यानविद्या या विषयात त्याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहे.


संस्थेअंतर्गत चालविल्या जाणारी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी येथील दहावीचा निकाल ९४.०२ टक्के असा आहे. बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९५.८३ टक्के आहे. व कला शाखेचा निकाल 90% आहे.


 तसेच मातोश्री कमलताई ठमके विद्यालय सुभाष नगर शाळेचा निकाल यावर्षी 100% लागलेला आहे.



प्रमुख पाहूणे म्हणून आपले मनोगत मांडत असतांना मा. कावली मेघना मॅडम, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, सदाचार अभ्यास करण्याची जिद्द व बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याचे गुण अंगीकारले पाहीजे.जेणे करूण आपले ध्येय साध्य करता येईल असा मौलीक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


अध्यक्षिय समारोप करताना मा. आमदार भिमराव केराम यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगीतलेली माऱ्याच्या व मोक्याच्या जागा काबिज करा या प्ररेणादायी शब्दांची आठवण करून दिली. तसेच किनवट सारख्या आदिवासी भागात ठमके दामपत्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जे कार्य करत आहे ते वाखण्याजोगे आहेत असे गौरवोद्गार काढले. तसेच हा गुणवंताचा सत्कार सोहळा घडवून आणला याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ व संलग्न सर्व विद्यालये व कनिष्ठ  महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.


विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत मांडतांना सुयश प्रशांत ठमके यांने आपल्या यशाचे गमक सांगत असतांना परीक्षेला आंनदी मनाने सामोरे गेले पाहिजे व कष्ट, जिद्द आणि परिश्रम ही त्रिसुत्री आपल्या जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यानी राबवावी असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.सुयशने आपल्या यशाचे श्रेय अध्यापक वर्ग व आई-वडीलानां समर्पित केले.


सदरील कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकूर यांनी केले तर आभार प्रज्ञा पाटील मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या समारंभास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थीनी, परिसरातील नागरीक व विविध वृत्तपत्रातील पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.