Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

काँग्रेसच्या किनवट विधानसभा निरीक्षकपदी गिरीश नेम्मानीवार

  ( राजेश पाटील ,किनवट शहर प्रतिनिधी) काँग्रेस प्रदेश कमिटीने किनवट माहूर विधानसभेच्या निरीक्षकपदी युवा, तडफदार नेते गिरीश यादवराव नेम्मानीवार यांची निवड केली आहे. किनवट मतदारसंघात काँग्रेस सरचिटणीसाचे पद प्रामाणिकपणे सांभाळीत पक्ष बळकट करण्याचे काम करणारे गिरीश नेम्मानीवार या तरूण कार्यकर्त्यांवर ही महत्वाची जबाबदारी सोपवल्यामुळे युवा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हातात कमळ घेतल्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागेल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुनश्च उभारी देण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदे- शाध्यक्ष नाना पटोले यांनी त्वरेने राज्यातील विधानसभेच्या २५२ मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसमधील जुन्या जाणत्या नेत्यांऐवजी तरुणाईस बळ दिल्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे. काँग्रेस पक्षात अनेक वर्ष निष्ठेने काम केल्यानंतर वरिष्ठ नेते का

श्रीमती कावली मेघना भा. प्र. से. यांची किनवट येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

  राजेश पाटील/किनवट शहर प्रतिनिधी:- पांढरकवडा येथील नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती मेघना कवाली (भा. प्र .से.) यांची नियुक्ती किनवट येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे असे महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सु.मो.महाडिक यांचे पत्र दि.२४/०२/२०२४ चे प्राप्त झाले आहे किनवट येथे तरुण सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी रुजु होत असल्याने नक्कीच किनवट येथील आदिवासी दुर्गम तालुक्याचा विकास व कायापालट होईल दर्जेदार कामे होतील अशी नागरी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून अन्नदान व रक्तदानाचे आयोजन

 किनवट.. रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर व अन्नदान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते अजय पाटील कदम युवासेना तालुकाप्रमुख  व अजय पवाडे मराठवाडा लॅब यांच्या सहकार्याने यांनी केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार प्रदीप नाईक.मा.नगराध्यक्ष इसा खान साहेब. मा.जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर.युवानेते सचिन नाईक. शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे. शहरप्रमुख  सुरज सातुरवार. मा. नगराध्यक्ष साजित खान. मा.नगराध्यक्ष के मूर्ती.विनोदादा भरणे. अनिल पाटील. गिरीश नेमानिवर. मुसा खान. करपुडे पाटील. बाळकृष्ण कदम.किरण ठाकरे .प्रकाश गब्बर राठोड. अशोकांना निमनिवार गजानन कोल्हे पाटील उपजिल्हाप्रमुख शिवसेना. नगरसेवक जहीर खान.संतोष डांनगे पाटील. आशिष कराळे. भाजपा युवामोर्चा अध्यक्ष आशुतोष बेद्र पाटील.गंगासागर शिंदे. लक्ष्मीपती दोनपेलीवार.बालाजी बामणे. अकबर. खान. राकेशभाऊ किनवटकर .अँड.सुनील येरेकार. गुत्तेदार अंकुश भालेराव.संदीप निकाते. पवन सरपे.शिवा पवार.प्रदीप कदम. सुमित माने.प्रदीप आकाश इंगळे.ॲड.विजय कदम.युवामोर्चा शहराध्यक्ष अक्षय

विविध शैक्षणीक, सामाजिक उपक्रमानी शिव जयंती साजरी

  किनवट:- तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय .... चा जयघोष आणि विविध , सामाजिक ,शैक्षणीक उपक्रमांच्या आयोजनासह ३९४ वी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती किनवट शहरातील छत्रपती चौकात सोमवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे सकल मराठा समाजाच्यावतीने महिलांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले. अभिवादन केले. शिवप्रेमींनी सर्वत्र ध्वज, पताकांनी सजविल्याने परिसर भगवे झाल्याचे भासत होते. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित विविध उपक्रमांत सोमवारी सकाळी ०८ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी छापील चित्रांमध्ये रंगभरण स्पर्धा, ०९ वाजता वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान, गोकुंदा ते छत्रपती चौकापर्यंत शिवप्रेमी तरण्याबांड युवकांनी दुचाकी रॅली शिस्तबद्ध काढून लोकांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजे होते. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती, महिला सन्मान, निर्भिडता त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या या लोकोत्तर गुणांची आठवण करीत त्यांच्या इतिहासाचे

म.ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर

किनवट: राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची ता.11 एप्रिल व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ता.14 एप्रिल रोजी संयुक्त जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरी होत असून या निमित्ताने जयंती समितीची कार्यकारीणी गठीत करण्यासाठी सिध्दार्थनगर येथील जेतवन बुध्दविहार येथे दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सायं.7 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विचार विमर्ष केल्यानंतर सर्वानुमते जयंतीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील यांची तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर यांची निवड करण्यात आली.       निवड करण्यात आलेली कार्यकारीणी पुढील प्रमाणे ः- अध्यक्ष -गौतम पाटील, उपाध्यक्ष-निखिल दि.कावळे/योगेश भवरे, सचिव-प्रशिक मुनेश्‍वर, सहसचिव - आकाश सर्पे/ संघर्ष घुले, कोषाध्यक्ष -सूरज भरणे/आकाश आळणे, सहकोषाध्यक्ष -स्वप्नील सर्पे/ निवेदक कानिंदे, संयोजक- सुरेश कावळे. संघटक पदी शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, सचिन कावळे, सुगत भरणे, रुपेश भवरे, राजू कावळे, प्रतिक नगराळे, पंकज नगारे व प्रसिध्दी प्रमुख म्हणून रवि कांबळे, राजेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.     बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.मिलिंद सर्पे हे होते. जयंत

सकल मराठा समाजाच्या वतीने आज किनवट- गोकुंदा बंदचे आवाहन

किनवट/प्रतिनिधी: दिनांक १४/०२/२०२४ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक व आवाहन करण्यात आले  आहे. त्या समर्थनात दिनांक १५/०२/२०२४ रोजी किनवट-गोकुंदा बंद करण्यात येणार असल्याचे निवेदन माननीय तहसीलदार किनवट यांना सकल मराठा समाज किनवट च्या वतीने देण्यात आले आहे. तसेच दिनांक १५/०२२०२४ रोजी गुरुवारी किनवट व गोकुदा येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

असा रंगला चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम !

  किनवट ( प्रतिनिधी ) : कमठाला केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, भीमराव कुरसंगे, तंटामुक्त समितीचे गोपीनाथ पाटील, योगेश राघू, विजय पावडे, अनंता बादड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य बक्षीसे देण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदविधर शिक्षक अंकुश राऊत यांनी, प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी, तर आभार विद्या श्रीमेवार ह्यांनी केले. तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे यांनी  तांत्रीक बाबी सांभाळली तर एकनाथ बादड आणि ग्रामशिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, युवक मंडळांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.             कार्यक्रमाच्या प्रारंभी शुभ दिन आयो रे..या गीताने झाला. त्यानंतर कु. मंत्रा गुंजकर हिचे मी 'जिजाऊ बोलतोय ' सम्रदा बादड हिचे 'मी सावित्री बोलतोय

किनवट येथे जा. बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी

  जागतिक बौद्ध धम्म परिषदे निमित्त किनवट येथील भीमयान समता नगर परिसरात तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास रंग रंगोटी करण्यात येत आहे तर एका छाया चित्रात नगर परिषद कर्मचारी साफ सफाई करत आहेत दुसऱ्या छाया चित्रात भव्य मंडप टाकण्यात येत आहे त्याचे हे बोलके छायाचित्र  छाया- राजेश पाटील किनवट

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात दारु भट्टीस परवानगी देऊनये या करीत निवेदन

  किनवट प्रतिनिधी - आपण महापुरुषाचे विचार अंगिकारून त्यांच्या आदर्श विचारावर चालत असतो त्यांचे विचार आपल्याला सदैव प्रेरीत करत असतात परंतू काही धन दांडग्यांनी याच्या उलट काम करण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणून या विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष लक्ष्मीपती दोनपेल्लीवार , दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष भगवान मारपवार यांनी समाज जागृतीचे काम केले आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या अलीकडील असेलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परीसरात देशी दारूचे दुकान थाटत असलेल्या विकृत विचारा विरोधात किनवट नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक भिसे मॅडम यांना या बद्दल निवेदन दिले यावेळी नप कर्मचारी शे. अतीक, तोफीक खान, रमेश नेम्मानीवार यावेळी उपस्थित होते.  तात्काळ या वर कार्यवाही करून या परिसरात देशी दारु दुकानास परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे या बाबीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे