Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

सिद्धार्थ नगर येथे अश्वीन पौर्णिमा (कोजागीरी) साजरी

  ता. प्र. किनवट :- सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात अश्वीन पौणीमा साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरवातीला कु. प्रतिक्षा ठमके यांनी बुद्ध वंदना, धम्म वंदना घेतली व सामुहीक तथागतांना वंदन करण्यात आले . कार्यक्रमानंतर खिर व अल्पपोहार वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रभागाबाई कावळे, कमलबाई भरणे, राहीबाई पाटील, सागरबाई नगारे, कचरूबाई मुनेश्वर, सुधाबाई परेकार, सुमीत्राबाई कावळे, ललीता मुनेश्वर, वर्षा ठमके, वनीता पाटील, धम्मज्योती मुनेश्वर,रुपाली कावळे रोहीणी मुनेश्वर, लक्ष्मीबाई पाटील, माला नगारे, ज्योती कावळे, शोभा भवरे, माया धुप्पे, सुजाता भरणे, सवीता भरणे, योजना पाटील, शशीकला कावळे, जयमाला आळणे आदी महीला व बाल बालीका उपस्थित होत्या.

किनवट/ माहुर चे आमदार भीमराव केराम यांच्या स्थानिक विकास निधीतुन दोन रुग्णवाहीकेचे लोकार्पण

  (ता. प्र. किनवट  ) स्थानिक आमदार विकास कार्यक्रम सन२०२०-२१ अंतर्गत किनवट/ माहुर चे आमदार भीमराव केराम यांच्या हस्तो आज गुरुवार ता.२९ रोजी वि.स.स. एस.डी.एच. गोकुंदा करीता व वि.स.स. माहुर यांच्या स्थानिक निधीतुन आज दोन रुग्ण वाहीकेचे लोकार्पण करण्यात आले रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा या उद्देशाने या रुग्ण वाहीकेचे लोकार्पण करण्यात आले या वेळी साने गुरुजी रुग्णालय परीवाराचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे ,उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा चे अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे,माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान, किनवट नगरीचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी न.प. उपाध्यक्ष श्रीनीवास नेमान्नीवार, व्यंकट नेमान्नीवार, आदीवासी नेते नारायण सिडाम, अनिल तिरमनवार, गिरीश नेमान्नीवार, दत्ता आडे, बालाजी पावडे, मारोती भरकड, प्रकाश कुडमुते, निळकंठ कातले, संतोष मऱ्हसकोले, रामेश्वर गिनगुले आदी उपस्थित होते .

भाग्यरथाबाई उद्धवराव कदम यांचे हृदय विकाराच्या आजाराने निधन आज २६ रोजी सांय ५ वाजता अंत्यसंस्कार

 *(निधन वार्ता)* भाग्यरथाबाई उद्धवराव कदम राहणार: समता नगर किनवट यांचे ७२ व्या वर्षी आज ९:३० च्या सुमारास ऱ्हदय विकाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी शांतीभूमी परीसर  बौध्द स्मशान भुमी येथे दि.२६ रोजी सांयकाळी ठिक ५ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात २ मुल व ५ मुली , जावई , नातवंड असा परीवार आहे. समाज सेवीका ,माजी नगर सेवीका आशाताई कदम , किनवट न्युज चे संपादक तथा निसर्गोपचारक  गंगाधर कदम , हंसराज कदम ह्यांच्या त्या मातोश्री होत.

किनवट शहरात विविध ठिकाणी ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन हर्षोल्हासात साजरा

(किनवट शहर प्रतिनिधी ): :भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखेच्या वतीने रविवारी(दि.२५)६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.किनवट व गोकुंदा परिसरातल वार्ड व नगरामध्ये सकाळी ७:३०वाजता धम्मध्वजारोहण    करण्यात आले.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, गोकुंदा येथे सकाळी ठिक ८:३०वाजता धम्मध्वजारोहण व वंदना घेण्यात आली. किनवट येथील मुख्य कार्यक्रम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी दहा वाजता झाला. तालुका अध्यक्ष  अभियंता प्रशांत ठमके  यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण  करण्यात आले.याप्रसंगी संस्कार विभागाच्या वतीने महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुहिक  वंदना घेतली.सिद्धार्थनगर येथील जेतवन बुद्ध विहारात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले.सूत्रसंचालन प्रा.सुबोध सर्पे यांनी कले.२२ प्रतिज्ञा चे सामुदायिक वाचन महेंद्र नरवाडे यांनी केले.      यावेळी विनोद भरणे,देविदास मुनेश्वर, प्रा.अंबादास कांबळे,प्रा.पंजाब शेरे,उत्तम कानिंदे,प्रा.रविकांत सर्पे,प्राचार्या शुभांगी ठमके,संगिता पाटील,दिव्या सर्पे , च

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ उद्या कार्यक्रम..

प्रतिनिधी किनवट,दि.२४ :भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा किनवट च्या वतीने रविवारी(दि.२५)६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे.किनवट व गोकुंदा परिसरात प्रत्येक वार्ड व नगर मध्ये सकाळी ठिक ७:३०वाजता धम्मध्वजारोहण    करावे,असे आवाहन भारतीय बौध्द महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, गोकुंदा येथे सकाळी ठिक ८:३०वाजता धम्मध्वजारोहण व वंदना घेण्यात येईल. किनवट येथील मुख्य कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ठिक ९:३०वाजता होणार आहे. तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण  होईल .याप्रसंगी संस्कार विभागाच्या वतीने वंदनाही घेण्यात येणार आहे .भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटचे पदाधिकारी व आपापल्या नगरातील पदाधिकारी ,बौद्ध उपासक- उपासिका यांनी शारीरिक अंतर ठेवून व शासनाचे नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन बौध्द महासभेचे तालुका सचिव आयु.महेंद्र नरवाडे यांनी केले आहे

राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास केंद्र बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवटच्या वतीने माझे कुंटूब, माझी जबाबदारी माहीम अंतर्गत जनजागृती

 (गोकुंदा ग्रामीण:प्रतिनिधी)   बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,नाशिक अभ्यास केंद्र बळीराम पाटील महाविद्यालय ,किनवटच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत किनवट परिसरातील जनतेचे  कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, संस्थेचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील नवाखेडा येथे रासेयो स्वयंसेवक यांनी कोरोना, महामारीपासून बचाव करण्यासाठी रोज स्वच्छ हात धुवावे,मास्क वापरावे, कणकण वाटत असल्यास दवाखाण्यात दाखवावे. बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुऊनंच घरात जावे. आपल्या कुटुंबाला कोरोनापसून दूर ठेवण्याची जबाबदारी तुमचीच आहे. ताप, खोकला, सर्दी, गळयात त्रास होत असेल तर दवाखाण्यात जाऊन तपासणी करुन घ्यावे असे जनजागृती करतांना रासेयो स्वयंसेवक सांगत आहेत.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद

वाचन प्रेरणा दिना निमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात एक दिवसीय वेबिनार संपन्न

(किनवट ता . प्रतिनिधी)  बळीराम पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग याच्या संयुक्त विद्यमाने देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. वाचन प्रेरणा  दिनाचे औचित्य साधून एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी केले. वेबिनारमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. डॉ. विनायक पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापुरुषांचे विचार आत्मसात करावे. वाचन वाढवावे. वाचनाने जीवनात उभे राहण्यासाठी बळ मिळते. गरिबीवरमात करुन शैक्षणिक विजय मिळवावे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन करुन वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. वाचन संस्कृती व कवितेतील संवेदना या विषयच्या अनुषंगा

कु.रक्षा नगराळे यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्काराने सन्मानित

(यवतमाळ/राळेगाव प्रतिनिधी) राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२० पुरस्कार सोहळा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण शानदार सोहळा नुकताच संपन्न झाला.महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या १०१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा,मानकरी बॅच,महावस्त्र, गौरवपदक,सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला.आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कार या पुरस्काराची मानकरी राळेगाव येथील भारतीय नारी रक्षा संघटनेच्या सदस्यां सौ.दिक्षा नगराळे यांची कन्या कु.रक्षा नगराळे ठरली राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव २०२० हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प श्री. केशव जी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तत्वचिंतक ह भ प श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर,ज्येष्ठ समाजसेवक श्री. अशोकानंद जी जवळगावकर,ज्येष्ठ साहित्यिक श्री. रमेश आव्हाड,ज्येष्ठ पत्रकार श्री.सदानंद खोपकर, सुप्रसिद्ध आदर्श शिक्षिका श्रीमती मनिषा क

अंबाडीच्या सरपंचपदी वंदना किशन गेडाम यांची बिनविरोध निवड

  ✍️किनवट तालुका प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना किशन गेडाम यांची बिनविरोध निवड झाली आहे. थेट जनतेतुन निवडुन आलेल्या सरपंचानी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना यापुर्वीच बडतर्फ केल्याने नऊ महिन्यानंतर अंबाडी  ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची  निवडणुक आज पार पडली नऊ सदस्यीय ग्रामपंचायत सरपंच निवडीच्या वेळी एक ग्रा.प.सदस्य अनुपस्थीत होता . आठ सदस्य उपस्थित होते ग्राम पंचायतीच्या सभागृहात सरपंच पदाच्या निवड प्रकीयेला सुरवात झाल्यानंतर सरपंच पदासाठी केवळ  वंदना गेडाम यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणुक बिनविरोध पार पडली . पिठासीन अधिकारी म्हणुन नायाब तहसीलदार सर्वैश मेश्राम यांनी काम पाहीले सहाय्य मंडळ अधिकारी पी.व्ही. बुरकुले , तलाठी नारमवाड आदींनी सहकार्य केले . नुतन सरपंच वंदना गेडाम यांचा हिगोंली लोकसभेचे खासदार व किनवर- माहुर विधान सभेचे आमदार भीमराव केराम यांनी बिनविरोध निवडी बद्दल सुशिक्षित युवा नुतन सरपंच वंदना गेडाम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला या निवडीने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे .