Skip to main content

वाचन प्रेरणा दिना निमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात एक दिवसीय वेबिनार संपन्न


(किनवट ता . प्रतिनिधी)

 बळीराम पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग याच्या संयुक्त विद्यमाने देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. वाचन प्रेरणा  दिनाचे औचित्य साधून एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी केले. वेबिनारमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. डॉ. विनायक पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापुरुषांचे विचार आत्मसात करावे. वाचन वाढवावे. वाचनाने जीवनात उभे राहण्यासाठी बळ मिळते. गरिबीवरमात करुन शैक्षणिक विजय मिळवावे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन करुन वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. वाचन संस्कृती व कवितेतील संवेदना या विषयच्या अनुषंगाने बहारदार रचना सादर करुन मंने जिंकले. रासेयोमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय सेवा करण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे सांगितले. 

     प्रा. डॉ. शिवराज बोडके, संचालक ,रासेयो विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांनी रासेयोचे कार्य या विषयावर रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. विजय खूपसे, प्रा. डॉ. अंबादास कांबळे, प्रा. डॉ. आनंद भालेराव, राजेंद्र धात्रक, मिलिंद लोकडे, यांनी सहकार्य केले.आभार प्रा. सुलोचना जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला