Skip to main content

Posts

बहुजन समाज पार्टी तातडीची बैठक

  नांदेड (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, पेरियार ई. व्ही. रामस्वामी नायकर, बिरसा मुंडा, अदी तमाम बहुजनवादी महापुरुषांच्या तसेच बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, आयरन लेडी बहन मायावतीजी यांच्या विचारावर काम करणारी बहुजन समाज पार्टीचे सर्व आजि-माजि पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांना कळविण्यात येते की, रविवार, दिनांक 25/01/2026 रोजी दुपारी ठीक 1.00 वाजता 'बीएसपी भवन', कावळे कॉम्प्लेक्स, वाय पॉईंट, गणेश नगर रोड, नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन, सदर बैठकीमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा कार्यकारणी, युवा आघाडी, विद्यार्थ्यी आघाडी, महिला आघाडी, शहर कार्यकारिणी, बिव्हीएफ तसेच विविध भाईचारा कमिट्या गठीत करावयाच्या आहेत. अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.संतोष शिंदे व मराठवाडा झोन प्रभारी मा.मनीषभाऊ कावळे यांनी दिली आहे. तरी जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीच्या आजि-माजि पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी सदर बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे.
Recent posts

सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयात बोली भाषेचा जागर

किनवट प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी  सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट येथे घेण्यात आला. मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध व संपन्न भाषा आहे मराठीच्या विविध बोली या मराठी भाषेचे वैभव आहेत बोलीभाषा ही महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलली जाणारी मराठी भाषेची प्रादेशिक अभिव्यक्ती आहे मराठी भाषेच्या या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने  मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार व भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनानुसार  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलींचा जागर करताना अतिशय दुर्मिळ अशा कोल...

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रम

किनवट: प्रतिनिधी  बळीराम पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी भागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कल्लोळकार डॉ. वसंत राठोड यांचे 'बोलीभाषा व सद्यस्थिती'  या विषयावर तर प्रज्ञा घोडवाडीकर यांचे' किनवट परिसरातील बोलीचा वापर' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव,माजी संचालक विद्यार्थी कल्याण विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड   यांचे' मराठी भाषा व लेखन कौशल्य'या विषयावर प्रा. डॉ.राजू मोतेराव यांचे आदिवासी लोककला व बोली या विषयाच्या अनुषंगाने  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज  यांच्या साहित्य संपदेवर आधारित 'जाणीव' भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'कथाकथन' या सदराखाली विद्यार्थ्यांनी रचलेल्या कथेचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनामध्ये मह...

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक महोत्सव समितीवर अमन कुंडगीर यांची नियुक्ती

 किनवट | प्रतिनिधी: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती, किल्ले वाफगाव यांच्या वतीने किनवट तालुका प्रतिनिधी म्हणून श्री. अमन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचा आदेश समिती प्रमुख श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दिला. महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका पातळीवर समन्वय साधणे, जनसहभाग वाढविणे तसेच विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अमन कुंडगीर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अमन कुंडगीर यांच्या सामाजिक सहभागाचा आणि कार्याचा विचार करून ही नियुक्ती करण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे महोत्सव अधिक व्यापक आणि यशस्वी ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल किनवट तालुक्यातून अमन कुंडगीर यांचे अभिनंदन होत असून, त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हलसाठी अशोक वासाटे व दिलीप कोसले यांची निवड

  किनवट प्रतिनिधी/ राजेश पाटील-  दि. २,३,४,५ जानेवारी २०२६मध्ये होणाऱ्या पुणे येथील आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल काव्य महोत्सवासाठी किनवट येथुन   शिव-फुले- शाहु- आंबेडकर  प्रबोधन चळवळीतील कवी गितकार अशोक वासाटे पहिले सत्राचे अध्यक्ष म्हणून तर दुसऱ्या सत्रात शाहीर  दिलीप कोसले यांची निवड करण्यात आली आहे. एस. एम. जोशी फौंडेशन पुणे सभागृहात पार पडणाऱ्या या महोत्सवासाठी आयोजक विजय वडवेराव आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान यांचे नुकतेच निवड पत्र प्राप्त झाले आहे . क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले, व क्रा.महात्मा जोतीबा फुले यांचे विचार समाजात रुजवुन संविधान जन जागृती गेल्या विस वर्षा पासून वासाटे व कोसले करत  आले आहेत त्यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दत्ता राठोड, गणेश शेवाळे, आत्मानंद सत्यवंश, चंद्रकांत दर्शनवाड, प्रकाश येरेकार, डॉ. लोमटे, डॉ. डोखळे, साहेबराव वाढवे, राजेश घोडाम, रामा सोनुले, माजी प्राचार्य राजाराम वाघमारे, दिलीप मुनेश्वर,गौतम कनिंदे, महेंद्र नरवाडे, उत्तम कनिंदे, अनिल उमरे सह परिसरातील साहित्यिक कवी गायक प्रेमींनी ...

साने गुरुजी मल्टीस्पेशालीटी रुग्णालयाचे थाटात उद्घाटन

  किनवट,दि.२४ : साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी विश्वस्त रुग्णालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानिमित्त किनवट शहरात देश व राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व थोर मान्यवरांची प्रभावी उपस्थिती लाभली. या लोकार्पण सोहळ्यामुळे किनवटचा सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील मान अधिक उंचावला असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती. या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, पद्मश्री नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्योजक मदनलाल बलदोटा, डॉ. योगेंद्र वरडकर, डॉ. शुभांगी अहंकारी, सरपंच ईश्वर आरके, एमआयडीसीचे कोठारे, आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, सुहाना मसालेचे गिरीश क्षीरसागर तसेच व्यंकटेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आदरातिथ्य किनवटच्या नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी नगराध्यक्षा या नात्याने केले, तर युवा नेते करण येंड्रलवार यांनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला. या रुग्णालयाच्या माध्यमात...

रमेश मुनेश्वर व रुपेश मुनेश्वर या शिक्षक बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  किनवट प्रतिनिधी:  लातूर येथे संपन्न झालेल्या शिक्षक , कर्मचारी व अधिकारी विभागीय स्पर्धेत रमेश मुनेश्वर यांनी एकपात्री अभिनय व रूपेश मुनेश्वर यांनी स्वरचित काव्य सादरकीरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने तालुक्यातील या दोन शिक्षक  बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याने सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.      राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने दयानंद महविद्यालय , लातूर येथे शिक्षक , कर्मचारी व  अधिकारी यांच्या विभागीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तालुक्यातून प्रथम आलेल्या स्पर्धकांना यात सहभागाची संधी होती. यावेळी भूमिका अभिनय या क्षेत्रातील व्यसनाधीनतेवर मात या विषयावर तालुक्यातील शनिवारपेठ केंद्रातील दरसांगवी ( चि ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी 'मी हरलो होतो पण जिंकलो '  ही  एकपात्री नाटिका सादरकरून आणि स्वलिखित काव्य लेखन आणि सादरीकरण स्पर्धेत मोहपूर केंद्रातील लक्कडकोट जिल्हा परिषद प्राथमिक ...