( तालुका प्रतिनिधी किनवट)
किनवट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील चिन्नावार कॉम्पलेक्स येथे
दिनांक १८ मे २०२५ रोजी रविवारी रात्री ९.३० च्या दरम्यान अतुल हळदकर किनवट येथे यांच्या दुकानातील दोन कारागिरावर दाढी करण्यासाठी माझा नंबर का लावीत नाही म्हणून कारागीर१)हम्मनलू खासे व २)राजू सुरजवाड यांच्यावर प्राणघातकी हल्ला केला आहे.
त्या पैकी हम्मनलू दिगंबर खासे ह्याची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत समस्त समाज बांधव पोलिस स्टेशन किनवट येथे तळ ठोकून होते.
आरोपी वर गुन्हा दाखल झाला परंतु आरोपी सध्या फरार आहे.
आरोपी संदीप जाधव रा. गंगानगर किनवट येथील असून त्यास तात्काळ अटक करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले. लवकर अटक न झाल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळ, किनवट द्वारा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे
शिष्टमंडळाद्वारे भेट देऊन पोलिसांना सांगण्यात आले.
यावेळी नाभीक महामंडळाचे अध्यक्ष सिताराम राचटकर, शहराध्यक्ष अतुल हळदकर, वरिष्ठ नेते विजय पोलासवार व समस्त नाभीक महामंडळाचे पदधिकारी आदी उपस्थित होते.
सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुभाष झाडे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment