अर्धापूर प्रतिनिधी/राजेश पंडित
नाभिक समाजाचे जगणं मांडणारी ग्रामीण बोली भाषेतील कादंबरी अशोक कुबडे लिखित गोंडर कादंबरीला अखिल भारतीय जीवा सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने नुकताच मान्यवरांच्या हस्ते अशोक कुबडे यांना जिवाजी महाले या पुरस्काराने सन्मानित केले असून यामध्ये शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर,राष्ट्रीय सचिव प्रा.डॉ.दत्ता कुंचलवाड,राजेश गाजरे,लक्ष्मण कोंडावार,अशोक खोडके,उत्तम गाजलवाड.गंगाधर जाकारे,मारोती उर्फ बाळू पवार, मंगेश खोडके,आदी मान्यवर व समाज बांधव मोट्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
जिवा सेना नाभिक संघटनेने दिलेला 'जिवाजी महाले' हा पुरस्कार माझ्या पुढील साहित्यिक वाटचालीस प्रचंड बळ देणारा आहे.काल नांदेड येथे प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा समाजाची मिळाली प्रोत्साहनपर थाप आहे हे मी मानतो. आपल्या समाजाने आपले कौतुक करणे त्यातून प्रोत्साहन देणे. याचा खूप आनंद आहे.या पुरस्काराने पुढील वाटचालीस बळ मिळाले आहे.गोंडर कादंबरीला आजवर एकूण २६ पुरस्कार मिळाले आहेत. देश-विदेशात ही कादंबरी पोहचली आहे.हजारो प्रती खपल्या आहेत..चित्रपटाकडे या कादंबरीने वाटचाल केली आहे.अशा या वाटचालीत आपल्या समाजाने आणि आपल्या माणसांची हा पुरस्कार प्रदान करून माझ्यात एक नवचैतन्य निर्माण केले आहे.
-अशोक कुबडे
____________________
Comments
Post a Comment