Skip to main content

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेडमध्ये उत्साहात संपन्न दैनिक 'वीर शिरोमणी' व साप्ताहिक 'नंदगिरीचा कानोसा'चा वर्धापन दिनही साजरा

 



नांदेड, १८ मे – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व दैनिक 'वीर शिरोमणी' व साप्ताहिक 'नंदगिरीचा कानोसा' या वृत्तपत्रांचा वर्धापन दिन शनिवार, १८ मे रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अधिवेशनाची गरिमा वाढवली. 


सर्वप्रथम आमदार भीमरावजी केराम ,लंगर साहीब गुरुद्वाराचे गुलाबसिंग महाराज ,संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला करण्यात आली सर्व मान्यवरांचा येतोचित मानसन्मान सत्कार यावेळी करण्यात आला 


अधिवेशनाचे उद्घाटन  किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय

आमदार भीमराव केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी होते 



या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्या, माध्यम क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचे प्रश्न यावर सखोल चर्चा झाली. 


कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार भीमराव केराम साहेबांनी संबोधित करताना म्हणाले पत्रकारांच्या ज्या काही मागण्या आहेत शासन दरबारी लावून नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन 





संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की, "पुरोगामी पत्रकार संघ हा केवळ संघटनाच नव्हे, तर एका विचारसरणीचा, एका लढ्याचा झेंडा आहे. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता हा विचार संपूर्ण देशभर पोहोचला पाहिजे. माझ्या पत्रकार बांधवांच्या न्याय व हक्कांसाठी मी सदैव शासन दरबारी आवाज उठवत राहीन." 


कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर, मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे  आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे व नांदेड कार्यकारी मंडळ यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. 


यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे, राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड व विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, शेखर सोनवणे, राज्य सचिव दत्ता मुजमुले, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रेखा पाटील, राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अडांगळे (अन्याय अ. नि. समिती), राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान, तसेच राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, संघटक उपस्थित होते. 


उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज वाघ उपाध्यक्ष प्रदीप देवरे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मकबूल शेख उत्तर महाराष्ट्र संघटक प्रविण जाधव नाशिक जिल्हा अध्यक्ष मुकेश सोनवणे धुळे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील धुळे महीला जिल्हा अध्यक्ष सरोज पवार फरजाना शेख सटाणा (बागलाण) तालुका अध्यक्ष रमेश खैरनार तसेच

पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले, ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील, रायगड उपाध्यक्ष महेंद्र माघाडे, रायगड सचिव राजपाल शेगोकार, उरण तालुका अध्यक्ष प्रवीण नाईक, तालुका संघटक अलंकार कडू, पेण तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर यांचाही विशेष सहभाग होता. 


कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी संतोष कनाके, व उपाध्यक्षपदी गजानन दसरवार यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि आगामी काळात पुरोगामी पत्रकार संघटनेचे कार्य अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा निर्धार केला. 


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे संतोष कनाके, मोईन चव्हाण हर्षवर्धन कनाके गजानन दासरवार शुभम सिंह ठाकुर सर्व पदाधिकारी नांदेड जिल्ह्याची ची सर्व टीम आदिनी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...