किनवट उपकेंद्रात स्व. उत्तमराव राठोड यांची ९६ वी जयंती उत्साहात साजरी, AI तंत्रज्ञानाद्वारे घुमला स्व. उत्तमरावांचा आवाज
किनवट : प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संचलित कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (उपकेंद्र), किनवट येथे माजी खासदार स्व. उत्तमरावजी राठोड यांची ९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत, किनवटच्या सर्वांगीण विकासातील त्यांचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत जाधव यांनी स्व. उत्तमराव राठोड यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, "किनवटचा आज जो विकास आपल्याला दिसतो, त्यामागे उत्तमरावजींचा अत्यंत दूरदृष्टीकोन होता. त्यांनी घातलेल्या पायाभरणीमुळेच या दुर्गम भागाला विकासाची नवी दिशा मिळाली आहे." त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाष्याला उपस्थित विद्यार्थ्यांनी दाद दिली. AI तंत्रज्ञानाचा अनोखा प्रयोग या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर. डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी या तंत्रज्ञानाद्वारे स्व. उत्तमराव राठोड यांचा आवाज पुनरुज्जीवित केला. केंद्राच्या भविष्यातील वाटचा...