विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झिजणारे कलावंत शिक्षक प्रदीप कुडमते यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी -गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने
किनवट : एक चाणाक्ष , विद्यार्थीप्रिय , कवी , कलावंत शिक्षक प्रदीप देवराव कुडमते यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झिजवलं ; हे त्यांचं कार्य सर्व शिक्षकवृंदांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले. येथून जवळच असलेल्या घोटी येथील शिवाजीराजे मंगलकार्यालयात जि.प.प्रा.शाळा झेंडीगुडा लोणी येथील सह शिक्षक प्रदीप देवराव कुडमते यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे , नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख , जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे , माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार , पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे , सरपंच निर्मला मेश्राम , माजी सरपंच प्रकाश गेडाम , उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे , केंद्रिय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर , शिवाजी बरबडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थिती होती. गणेश येरकाडे यांनी सूत्रसंचालन केले व स्वागत गीत गाईले. अनिल ग...