विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झिजणारे कलावंत शिक्षक प्रदीप कुडमते यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी -गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने
किनवट : एक चाणाक्ष , विद्यार्थीप्रिय , कवी , कलावंत शिक्षक प्रदीप देवराव कुडमते यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झिजवलं ; हे त्यांचं कार्य सर्व शिक्षकवृंदांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले.
येथून जवळच असलेल्या घोटी येथील शिवाजीराजे मंगलकार्यालयात जि.प.प्रा.शाळा झेंडीगुडा लोणी येथील सह शिक्षक प्रदीप देवराव कुडमते यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
यावेळी भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे , नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख , जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे , माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार , पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे , सरपंच निर्मला मेश्राम , माजी सरपंच प्रकाश गेडाम , उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे , केंद्रिय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर , शिवाजी बरबडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थिती होती.
गणेश येरकाडे यांनी सूत्रसंचालन केले व स्वागत गीत गाईले. अनिल गुंजकर यांनी प्रास्ताविक केले. विजय पेंदोर यांनी आभार मानले.
याप्रसंगी गोपाल गेडाम , राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त केंद्र प्रमुख रामा उईके , दीपक राणे , केंद्रप्रमुख विजय मडावी , उत्तम कानिंदे , गोपाल कनाके , किशन धुर्वे या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रदीप देवराव कुडमते व यमुना प्रदीप कुडमते यांना सेवानिवृत्ती निमित्त पुष्पगुच्छ , महावस्त्र व सन्मानपत्र देऊन आमदार भीमराव केराम यांचे हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर कमठाला केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांचे हस्ते त्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विकास कुडमते , अरुण कुमरे , लक्ष्मण कनाके आदीं मान्यवरांसह बहुसंख्येने शिक्षक , कर्मचारी व त्यांचे नातलग उपस्थित होते.
चौकट
आमदार भीमराव केराम यांचे गौरोद्गार
माझ्या नात्यातील प्रदीप कुडमते हे अत्यंत चांगले शिक्षक असून त्यांचे अनेक विद्यार्थी सैन्यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आज आमच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत व्यस्त कार्यक्रम असतांना केवळ सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही येथे वेळातला वेळ काढून आलोत. जय जंगो रायताड त्यांना सुदृढ आयुष्य देवो, त्यांना दीर्घायुरोग्य लाभो ! अशी मी मनोकामना करतो , असे गौरोद्गार आमदार भीमराव केराम यांनी याप्रसंगी काढले.

Comments
Post a Comment