किनवट : एक चाणाक्ष , विद्यार्थीप्रिय , कवी , कलावंत शिक्षक प्रदीप देवराव कुडमते यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झिजवलं ; हे त्यांचं कार्य सर्व शिक्षकवृंदांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले. येथून जवळच असलेल्या घोटी येथील शिवाजीराजे मंगलकार्यालयात जि.प.प्रा.शाळा झेंडीगुडा लोणी येथील सह शिक्षक प्रदीप देवराव कुडमते यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे , नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख , जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे , माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार , पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे , सरपंच निर्मला मेश्राम , माजी सरपंच प्रकाश गेडाम , उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे , केंद्रिय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर , शिवाजी बरबडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थिती होती. गणेश येरकाडे यांनी सूत्रसंचालन केले व स्वागत गीत गाईले. अनिल ग...
किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील प्रगल्भ व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...