(किनवट प्रतिनिधी)
दि.२१ रोजी किनवट तालुक्यातील कलाकारांची बैठक श्री जेष्ठ शाहीर किसन ठमके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चर्चा करण्यांत आली.
ज्या खऱ्या कलाकारांना आणि कविंना त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाले नाही जे वंचित राहीले त्यांना आवाज देणे
खऱ्या सुरांना सुरेल लेखनाला आणि भावपूर्ण कवितेला हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांच्या वतिने नवपरिर्वतन कविस्वर कला मंच महाराष्ट्र राज्य या ग्रुपची स्थापना करण्यांत आली .
आजच्या या निमित्ताने या ग्रुपची संघटन रचना पुढील प्रमाणे घोषीत करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र राज्य पातळीवर शाहीर किसन ठमके प्रदेश अध्यक्ष ,श्री साहेबराव वाढवे प्रदेश उपाध्यक्ष ,कवि गितकार सुरेश शेंडे महासचिव ) पदी
तर नांदेड जिल्हा पातळीवर गायक विवेक ओंकार जिल्हाध्यक्ष ,गायक कामराज माडपेलीवार जिल्हा उपाध्यक्ष ,कवि गितकार बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे (महासचिव ) पदी.
किनवट तालुका पातळीवर
गायक आत्मानंद सत्यवंश अध्यक्ष ,उपाध्यक्ष शाहीर केशव महाराज ,
श्री राजेश ,घोडाम महासचिव ,श्री संघपाल कांबळे कोषाध्यक्ष ,संचालक सचिव सुनील उईके,
मार्गदर्शक गायक मारोती सुंकलवाड ,गायक राजेश पाटील, श्री दत्ता राठोड
श्री रमेश भवरे , गायक तुळशिराम गेडाम, गायक बोलेवार ,श्री लक्ष्मण कुंडगीर बॅन्जोमास्टर, श्री कांबळे बॅन्जोमास्टर ,श्री गायकवाड हार्मोनियम मास्टर, गायक मुनेश्वर मुंबई, गायक येरकाडे सर
या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. वरील पदाधिकाऱ्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.
श्री किशन ठमके यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले आहे की
आपला ठामविश्वास आहे की नवपरिर्वतन कविस्वर कलामंच - महाराष्ट्र राज्य हे व्यासपीठ खऱ्या कलाकारांना नवा आत्मविश्वास नवसंजीवनी व नवा आशेचा किरण देईल.

Comments
Post a Comment