किनवट: प्रतिनिधी
बळीराम पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी भागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कल्लोळकार डॉ. वसंत राठोड यांचे 'बोलीभाषा व सद्यस्थिती' या विषयावर तर प्रज्ञा घोडवाडीकर यांचे' किनवट परिसरातील बोलीचा वापर' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.
प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव,माजी संचालक विद्यार्थी कल्याण विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
यांचे' मराठी भाषा व लेखन कौशल्य'या विषयावर प्रा. डॉ.राजू मोतेराव यांचे आदिवासी लोककला व बोली या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या साहित्य संपदेवर आधारित 'जाणीव' भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'कथाकथन' या सदराखाली विद्यार्थ्यांनी रचलेल्या कथेचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनामध्ये महाविद्यालयातील कवी विद्यार्थी आपल्या रचना सादर करणार आहेत. याबरोबरच या कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे प्रा. गजानन सोनोने ,रामस्वरूप मडावी, रमेश मुनेश्वर,रूपेश मुनेश्वर, दीपक खंदारे,अविनाश शेरे,राजेश पाटील यासह अनेक कवी संमेलनामध्ये सहभागी होणार आहे. मराठी भाषा ,बोली, परिसरातील बोली ,यांचे संवर्धन करण्यासाठी मराठी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर, उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ.पंजाब शेरे यांनी कळविले आहे. कार्यक्रमाचे पूर्व नियोजन मराठी विभागाने केले आहे.

Comments
Post a Comment